सिरमा एसजीएसतर्फे पुण्यात सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्रांपैकी एकाची स्थापना

कंपनीच्या जागतिक कामकाजाला बळकट करण्यासाठी आणि वाढीच्या गतीला पूरक ठरण्यासाठी हे उत्पादन केंद्र महत्वाचे ठरणार आहे

भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम्स डिझाईन आणि उत्पादक कंपन्यांपैकी एक सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी लिमिटेडने पुण्याजवळील रांजणगाव येथे त्यांच्या सर्वात मोठ्या अत्याधुनिक समग्र इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्रापैकी एकाचे  उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. या उत्पादन केंद्राचे अधिकृत उद्घाटन प्रमुख ग्राहक आणि सिरमा एसजीएसचे कार्यकारी अध्यक्ष श्री. संदीप टंडन यांच्या उपस्थितीत झाले.

नवीन उत्पादन केंद्र 26.5 एकर जमिनीवर विस्तारलेले आहे आणि पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर 1.20 दशलक्ष चौरस फूट उत्पादन क्षेत्र असणार आहे. हे नवीन केंद्र कंपनीची  पीसीबी (प्रिंटेड सर्किट बोर्ड) असेंब्ली क्षमता वाढवेल आणि प्रामुख्याने ऑटोमोटिव्ह आणि औद्योगिक क्षेत्रातील पीसीबी साठीच्या वाढत्या मागण्या पूर्ण करेल. आज सुरु करण्यात आलेल्या केंद्राचा पहिला टप्पा 60,000 चौरस फूट असून या केंद्राद्वारे सुमारे 1,000 लोकांना थेट  रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे.

सुस्पष्ट दृष्टीकोनासह, कंपनीने आपली क्षमता जलद गतीने वाढवण्यासाठी आणि बदलत्या बाजारातील प्रवाहांमध्ये आघाडी टिकवण्यासाठी स्वतःला सज्ज केले आहे. कामकाज कार्यक्षमता वाढवून हे नवीन उत्पादन केंद्र कंपनीच्या विद्यमान उत्पादन क्षमतांना पूरक ठरेल. सिरमा एसजीएसला आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी वाढती मागणी पूर्ण करताना प्रमुख कंपनी  म्हणून स्थान मिळवून देईल.

या महत्वाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना, सिरमा एसजीएसचे अध्यक्ष श्री. संदीप टंडन म्हणाले, “सिरमा एसजीएस इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स डिझाईन आणि उत्पादन क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी असून नाविन्यपूर्ण उपायांद्वारे उद्योगातील प्रगतीला चालना देण्यास कटिबद्ध आहे. उत्कृष्टतेसाठी असलेली आमची बांधिलकी शाश्वत विकास सुनिश्चित करते आणि या क्षेत्रात नवीन मापदंड प्रस्थापित करते.”

सिरमा एसजीएसचे व्यवस्थापकीय संचालक श्री. जे एस गुजराल म्हणाले, “आमचे लक्ष आमच्या क्षमतांना मजबूत करण्यावर आणि बदलत्या बाजारातील मागण्या पूर्ण करण्यासाठी उत्पादन क्षमता वाढवण्यावर केंद्रित आहे. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला चालना मिळत असताना, आमचे पुणे केंद्र मोठ्या व्यावसायिक संधींचा फायदा घेण्यासाठी उत्तम प्रकारे सुसज्ज आहे.”

सिरमा एसजीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतेन्द्र सिंग म्हणाले, “हे नवीन पुणे उत्पादन केंद्र आमचे पहिले मल्टी-फॅसिलिटी केंद्र असून त्यात विविध क्षेत्रातील ग्राहकांना जागतिक स्तरावर सेवा देण्याची क्षमता आहे.”

सिरमा एसजीएस भारतीय आणि जागतिक OEMs च्या विविध इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन गरजा पूर्ण करण्यासाठी विस्तृत श्रेणीतील उपायसुविधा सादर करत आहे. यामध्ये उत्पादन डिझाइन, जलद प्रोटोटाइपिंग, पीसीबी असेंब्ली, बॉक्स बिल्ड्स आणि RFID टॅग्स, उच्च-फ्रिक्वेन्सी मॅग्नेटिक घटक, दुरुस्ती, पुनःकाम, आणि स्वयंचलित टेस्टर विकास सेवा यांसारख्या सानुकूलित एंड-टू-एंड उपायांचा समावेश आहे. उत्पादनाच्या एकूण कार्यकाळात प्रत्येक टप्प्यावर सर्वसमावेशक पाठबळ सुनिश्चित करण्यात आले आहे.