सणासुदीच्या काळात उपवासासाठी तीन नवीन उत्पादनांची श्रेणी लाँच
मालपाणीज् बेकलाईट या विश्वासप्राप्त फूड ब्रँडने नवरात्रोत्सवाचा शुभ मुहूर्त साधून उपवासाचे तीन उत्पादने सादर करण्याची घोषणा केली. उत्पादनांच्या या नव्या श्रेणीमध्ये बटाटा चिवडा (हिरवी मिरची), बटाटा चिवडा (लाल मिरची) आणि साबुदाणा चिवडा यांचा समावेश आहे.
मालपाणीज् बेकलाईटमध्ये रोजच्या फराळासाठी खास तयार केलेला उपवास चिवडा आहे. शुद्ध शाकाहारी कारखान्यात ते बनविले जातात, सोयीस्करपणे पॅक केले जातात, त्यात ताजेपणा आणि कुरकुरीतपणा टिकवून ठेवला जातो. काळे मीठ वापरून ते तयार केले जातात, ते पचायला हलके आणि कमी तेलकट असतात.
गोड आणि तिखट यांचे मिश्रण असलेला हा बटाट्याचा किस चिवडा कुरकुरीत बटाट्याचा किस आणि शेंगदाणे घालून तयार करण्यात येतो. हिरवी मिरची, पिठीसाखर आणि काळे मीठ, पेरलेला हा कोणत्याही वेळी चालणारा उपवासाचा नाश्ता आहे.
उपवासाच्या वेळी चविष्ट खाण्याची इच्छा होते तेव्हा सतत खावा असा हा साबुदाणा चिवड्याचा फराळ आहे. हलक्या आणि कुरकुरीत साबुदाणा आणि कुरकुरीत बटाट्याचा कीस वापरून चिवडा तयार केला जातो., ज्यामुळे चिवड्याची चव वाढते.
लाल मिरची बटाटा चिवडा हा एक तिखट चिवडा असून तो कुरकुरीत बटाट्याच्या कीस आणि शेंगदाणे घालून बनवला जातो. त्यावर लाल मिरचीचे तिखट पेरलेले असते.
ही सर्व चिवडा उत्पादने पुणे, पीसीएमसी, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, पंढरपूर, सोलापूर आणि उर्वरित महाराष्ट्रात उपलब्ध आहेत.
नवरात्री चा सण हा दुर्गा देवीच्या स्वरूपातील दैवी स्त्रीशक्तीचा सन्मान आणि उपासना करणारा गतिमान सण आहे. नवरात्रीतील प्रत्येक रात्र देवीच्या वेगळ्या रूपाला समर्पित असून ती जीवनाच्या विविध पैलूंचे प्रतीक असते, उदा. शक्ती, बुद्धी, करुणा इ.
गतिशील उत्सव, विधी आणि मिरवणुकांमध्ये भाग घेण्यासाठी भक्त एकत्र येतात. त्याची समाप्ती दसऱ्याच्या सणाने होते. तो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असतो.
उपवास हा या सणाचा अविभाज्य भाग आहे. अनेक लोक नऊही दिवस फळे आणि द्रव पदार्थांचे किंवा फक्त उकडलेले बटाटे, सुरण इत्यादीसारखे सात्विक अन्न किंवा विशिष्ट भाज्यांचे सेवन करून उपवास करतात. उपवास मिसळ, साबुदाणा खिचडी इत्यादी फराळाच्या विविध पदार्थांवर पेरणी करण्यासाठीही ह्या चिवड्यांचा वापर केला जातो.