जगातील सर्वात मोठ्या दागिने विक्रेत्यांपैकी एक असलेल्या मलाबार गोल्ड अॅण्ड डायमंड्सने दिवाळीसाठी खास ऑफर सुरू केल्या आहेत. प्रत्येक खरेदीसह ग्राहकांना हमी दिलेली सोन्याची नाणी आणि सोन्याच्या किंमतीतील बदलांपासून त्यांचे रक्षण करण्यासाठी दर संरक्षण योजनेचा लाभ देऊ करण्यात आला आहे. ही योजना सोने, हिरे आणि मौल्यवान खड्यांच्या दागिन्यांवर उपलब्ध आहेत.
राजस्थानमधील जोधपूर येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात बॉलीवूड अभिनेते आणि मलाबार गोल्ड अॅण्ड डायमंड्सचे ब्रॅण्ड ॲम्बॅसेडर अनिल कपूर यांनी या उत्सवी ऑफर्सचे अनावरण केले. या कार्यक्रमाला भारतातील कारभाराचे व्यवस्थापकीय संचालक, ओ. आशर, क्षेत्रीय प्रमुख (उत्तर) एन. के. जिशाद आणि विभागीय प्रमुख (उत्तर) के. पी. अनीस बशीर यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
मलाबार समूहाचे अध्यक्ष एम. पी. अहमद म्हणाले, “ग्राहकांच्या समाधानाला प्राधान्य देणारी आभूषण विक्रेते म्हणून, या खास दिवाळी ऑफर सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या ग्राहकांना अतुलनीय फायदे आणि एक अपवादात्मक खरेदी अनुभव देऊन त्यांच्यासाठी सणाचा हंगाम आणखी खास बनवण्याचे आमचे ध्येय आहे. जागतिक स्तरावर अग्रगण्य आभूषण विक्रेते बनण्याइतके कमावलेले यश हे आमच्या मौल्यवान ग्राहकांच्या सातत्यपूर्ण विश्वास आणि पाठबळाचीच पावती आहे.”
मलाबार गोल्ड अॅण्ड डायमंड्सच्या सर्व शोरूममध्ये ३ नोव्हेंबरपर्यंत वैध असलेल्या या दिवाळी ऑफर्समध्ये ५०,००० रुपये आणि त्या पुढील खरेदीवर सोन्याची नाणी : सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांना २०० मिलीग्राम, मौल्यवान, अनकट आणि पोल्की ज्वेलरी खरेदी करणाऱ्यांना ३०० मिलीग्राम आणि हिरेजडित दागिने खरेदी करणाऱ्यांना ४०० मिलीग्राम सोन्याचे नाणी मिळविता येतील. सोने दर संरक्षण योजना ग्राहकांना फक्त १० टक्के अग्रिम देयक भरणा (डाउन पेमेंट) करून दागिन्यांचे बुकिंग करणाऱ्या ग्राहकांस मिळेल. बुकिंग किंवा खरेदीच्या तारखेदरम्यान कोणताही कमी दर निवडण्याची त्यांना मुभा असेल.
या व्यतिरिक्त, ग्राहक जुन्या सोन्याची देवाणघेवाण करताना नवीन डिझाइन्सचा फायदा घेऊ शकतील. दिवाळीच्या खरेदीचा अनुभव आणखी वाढवण्यासाठी खास सवलतीच्या दागिन्यांचे संग्रहण असलेले विशेष ‘बाय काउंटर्स’ देखील सुरू करण्यात आली आहेत.