टीव्हीएस रेडर आयजीओसह लाँच – या विभागातील सर्वात वेगवान १२५ सीसी मोटरसायकल, सर्वोत्तम ‘बुस्ट मोड’सह

टीव्हीएस रेडरतर्फे नव्या व्हेरीएंटच्या लाँचसह १ दशलक्ष विक्रीचा टप्पा पार

 टीव्हीएस मोटर कंपनी (टीव्हीएसएम) या आघाडीच्या आणि दुचाकी व तीन चाकी क्षेत्रात कार्यरत असलेल्या जागतिक महत्त्वाच्या कंपनीने आज टीव्हेस रेडर आयजीओ हे नवे व्हेरिएंट लाँच केल्याचे जाहीर केले. या ब्रँडच्या एक दशलक्ष विक्रीचा टप्पा साजरा करण्यासाठी हे लाँच करण्यात आले आहे.

नव्याने लाँच करण्यात आलेल्या टीव्हीएस रेडरमध्ये आयजीओ असिस्ट तंत्रज्ञानयुक्त ‘बुस्ट मोड’ देण्यात आला आहे. विक्रीचा टप्पा साजरा करण्यासाठी टीव्हीएस रेडरने या विभागातील सर्वात वेगवान १२५ सीसी मोटरसायकल लाँच करत अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी असलेली बांधिलकी नव्याने जपली आहे. या व्हेरिएंटसाठी आकर्षक नवा नार्डो ग्रे कलर व त्याच्याशी सुसंगत रेड अलॉय देण्यात आले असून त्याचबरोबर अद्ययावत रिव्हर्स एलसीडी कनेक्टेड क्लस्टर ८५ कनेक्टेड वैशिष्ट्यांसह देण्यात आले आहे.

टीव्हीएस रेडरमध्ये देण्यात आलेले आयजीओ असिस्ट 11.75Nm@6000rpm चा या विभागातील सर्वाधिक टॉर्क देते. आयजीओ असिस्टमुळे रायडरला ० ते ६० किमीचा वेग बूस्ट मोड या वैशिष्ट्याच्या मदतीने केवळ ५.८ सेकंदांत गाठता येतो. त्याशिवाय इंधन कार्यक्षमतेमध्ये १० टक्के सुधारणा करण्यात आली आहे. पर्यायाने आतापर्यंत कधी न अनुभवलेला साहसी, रायडिंग अनुभव मिळतो.

या नव्या लाँचविषयी टीव्हीएस मोटर्स वरिष्ठ उपाध्यक्ष, कम्युटर व्यवसायाचे प्रमुख आणि कॉर्पोरेट ब्रँड व मीडियाचे प्रमुख अनिरूद्ध हलदार म्हणाले, ‘टीव्हीएस रेडर अजून जास्त खास बनली आहे. या विभागातील ‘बुस्ट’ मोड ०.५५ एनएमचा अतिरिक्त टॉर्क आणि १० टक्के सुधारित इंधन कार्यक्षमता देणारे आहे. आमचे जेनझी रायडर अक्सलरेशन आणि मायलेजविषयी जास्त जागरूक असतात व टीव्हीएस रेडर दोन्ही पातळ्यांवर उत्तम कामगिरी करते.

त्याशिवाय आकर्षक नार्डो ग्रे रंग व त्याला देण्यात आलेली रेड अलॉयची जोड यांमुळे आमच्या रायडर्सची स्टाइल आणखी उठून दिसते. रायडर्सना आनंद देण्यावर आम्ही सातत्याने भर देत असल्यामुळे टीव्हीएस रेडने अल्पावधीत १ दशलक्ष विक्रीचा टप्पा पार केला आहे. अशाप्रकारे ब्रँडला मिळत असलेले प्रेम भारावणारे आहे.’

डिझाइन तत्वांना अनुसरून टीव्हीएस रेडरने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करत मस्क्युलर स्ट्रीट अपील कायम राखले आहे. नवीन व्हेरिएंटमध्ये टीव्हीएस स्मार्टकनेक्ट तंत्रज्ञान आणि रिव्हर्स एलसीडी क्लस्टर ८५ ब्लुटुथ कनेक्टेड वैशिष्ट्यांसह देण्यात आले आहे. त्यामध्ये व्हॉइस असिस्ट, तपशीलवार नॅव्हिगेशन यांचा समावेश आहे. राइड रिपोर्ट्स आणि विविध रायडिंग मोड्स यांसारख्या वैशिष्ट्यामुळे टीव्हीएस रेडर आधुनिक जेनझी रायडर्सना रायडिंगचा अत्याधुनिक अनुभव घेता येईल.

 टीव्हीएस रेडरमध्ये अत्याधुनिक १२४.८ सीसी यर आणि ऑइल- कुल्ड थ्रीव्ही इंजिन देण्यात आले आहे, जे या क्षेत्रातील पहिल्या विविध राइड मोड्ससह 8.37kW@7500 rpm देते. जबरदस्त आरामदायीपणा आणि हाताळणीसह गॅस चार्ज्ड ५- स्टेप अडजस्टेबल मोनो शॉक सस्पेन्शन, कमी फ्रिक्शन असलेले फ्रंट सस्पेन्शन, स्पिल्ट सीट, ५ स्पीड गियरबॉक्स आणि १७ इंची अलॉय व्हील्स यांमुळे शक्य झाले आहे. टीव्हीएस रेडरची बांधणी आरामदायीपणा डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली असून त्याच्या वाइड स्पिल्ट सीट्स रायडरच्या सोयीस्करपणात भर घालतात.

नवीन टीव्हीएस रायडर आयजीओची किंमत रू. ९८.३८९ रुपये (एक्स शोरूम दिल्ली) ठेवण्यात आली आहे.