सोनी इंडियातर्फे सिनेमॅटिक अनुभव देणारे BRAVIA थिएटर U सादर

सोनी इंडियातर्फे बहुप्रतीक्षित BRAVIA थिएटर U च्या सादरीकरणाची घोषणा करण्यात आली. आपल्या स्वतःच्या लिव्हिंग रूमच्या आरामदायी वातावरणात आकर्षक सिनेमॅटिक अनुभव देण्यासाठी डिझाइन केले गेलेले हे अत्याधुनिक होम एंटरटेन्मेंट सोल्युशन आहे. नवीन वायरलेस नेकबँड स्पीकर तुमच्या कानाभोवती घुमणारा, खुल्या वातावरणातही वैयक्तिक श्रवणाचा अनुभव देणारा ध्वनी सादर करतो.

BRAVIA थिएटर U सभोवतालच्या वातावरणाची काळजी न करता, उच्च आवाजात चित्रपटगृहाचा गुंगवून टाकणारा अनुभव देते. BRAVIA थिएटर U आणि त्याला सुसंगत BRAVIA यांच्या एकत्रिकरणातून रोमांचक Dolby Atmos® अनुभवाचा आनंद घेता येतो आणि चित्रपट पाहणे अधिक रोमांचक बनविता येते. 360 Spatial Sound सोनीच्या सुसंगत BRAVIA टीव्हीसोबत जोडल्यावर वातावरणीय श्रवणासाठी तुमचे स्वतःचे ध्वनी क्षेत्र तयार करते.

X-Balanced स्पीकर युनिट चित्रपट आणि नाट्यप्रयोगांना चित्रपटगृहासारख्या ध्वनियंत्रणेने उंचावते. त्यामुळे कलाकारांद्वारे बोललेला प्रत्येक शब्द स्पष्ट आणि अचूक ऐकता येतो. स्पीकर ॲड फंक्शनचा वापर करून एकाच टीव्ही किंवा इतर उपकरणांसह दोन BRAVIA थिएटर U स्पीकर्स कनेक्ट करता येतात. BRAVIA थिएटर U दीर्घकाळ चित्रपट पाहण्याच्या सत्रांसाठी अतुलनीय आराम देण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

तुम्ही किती वेळ बघत आहात, गेमिंग किंवा काम करत आहात, याचा फरक पडू न देता, हलके डिझाइन आणि सुरक्षित बसणारी यंत्रणा तुमची मान आणि खांदे आरामात राहतील, हे सुनिश्चित करेल. कुशन केलेले साहित्य आरामदायी अनुभव प्रदान करतात, तर ॲडजस्टेबल वैशिष्ट्यांमध्ये वेगवेगळे हेड साइज आहेत. त्यामुळे एकूणच परिधान करण्याची क्षमता सुधारते. एर्गोनोमिक डिझाइन एक आरामदायी आणि सुरक्षित अनुभव सुनिश्चित करते, त्यामुळे वापरकर्त्यांना खूप वेळ त्यांचे आवडते चित्रपट अवघडून न बसता सहजपणे पाहण्याची संधी मिळते.

BRAVIA थिएटर U विशेषतः BRAVIA टीव्हीसोबत सुसंगत डिझाइन केलेले असून, अतुलनीय होम एन्टरटेन्मेंट अनुभव देते. 4K HDR इमेजरी आणि आकर्षक ध्वनीसह BRAVIA टीव्हीसोबत जोडल्यावर हे दृश्य आणि ध्वनीचे समन्वय वाढविते. दीर्घकाळ चित्रपट पाहणे किंवा गेमिंग सत्रांदरम्यान अखंड मनोरंजन सुनिश्चित करत, हे अतुलनीय १२ तास बॅटरी लाइफ पुरवितात. जोडीला क्विक चार्ज वैशिष्ट्य फक्त 10 मिनिटांच्या चार्जिंगसह एक तास अतिरिक्त प्ले टाइम देते. सुस्पष्ट व्हॉइस पिकअप तंत्रज्ञानाचा वापर करून एआय-आधारित आवाज कमी करण्याची अल्गोरिदम विविध प्रकारच्या वातावरणात उत्कृष्ट कॉल स्पष्टता पुरवितात.

BRAVIA थिएटर U मधील मल्टीपॉइंट कनेक्शन वापरकर्त्यांना दोन उपकरणे एकाच वेळी कनेक्ट आणि स्विच करण्याची अनुमती देते. होम एन्टरटेन्मेंट सेटअपमध्ये लवचिकता आणि अधिक कार्यक्षमतेची मागणी करणाऱ्या ग्राहकांसाठी हे आदर्श आहे. BRAVIA थिएटर U चे IPX4 वॉटर रेसिस्टंट असल्याने ते दररोजच्या वापरासाठी योग्य असून, आकस्मिक पाणी सांडल्यास त्यापासून त्याचे संरक्षण होते. हे वैशिष्ट्य त्याची व्यावहारिक उपयुक्तता वाढविते आणि वापरकर्त्यांना त्यांचे मनोरंजन संभाव्य नुकसानीबद्दल काळजी न करता आनंद घेता येईल, याची अनुमती देते.

किंमत आणि उपलब्धता

BRAVIA थिएटर U सर्व सोनी सेंटर्स, सोनी अधिकृत डीलर्स, ई-कॉमर्स वेबसाइट्स (ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट) आणि भारतातील प्रमुख इलेक्ट्रॉनिक स्टोअर्समध्ये २३ सप्टेंबर २०२४ पासून उपलब्ध असेल.