‘जावा येझदी मोटरसायकल’तर्फे पुण्यात ‘३५० जावा ४२ एफजे’चे अनावरण; सणासुदीच्या विशेष वितरणाला सुरुवात

 

  • ‘जावा’ने पुन्हा एकदा रु. १.९९ लाख रुपयांपासून सुरू होणाऱ्या किमतींसह (एक्स-शोरूम दिल्ली) श्रेणी केली खंडित; डिझाईन, कामगिरी आणि किंमत या त्रिमूर्तीचे वितरण.
  • ‘४२ लाइफ’ मालिकेचा विस्तार – ४२, ४२ बॉबर आणि आता ४२ एफजे
  • रस्त्यावर ठळक उपस्थिती : मोठा व्हीलबेस, मोठा ग्राउंड क्लीयरन्स
  • या सेगमेंटमध्ये प्रथमच ब्रश्ड ॲल्युमिनियम टॅंक पॅनेल
  • वर्धित एर्गोनॉमिक्ससह सर्वथा नवीन मस्क्युलर निओ-क्लासिक डिझाइन
  • वेगळ्या साउंडट्रॅकसह नवीन अपस्वेप्ट एक्झॉस्ट; ऑल-एलईडी प्रकाशयोजना
  • या वर्गात अग्रणी कामगिरी करण्याससाठी नवीन ३५० अल्फा-२ इंजिन
  • व्यवस्थित हाताळणीसाठी मानके प्रस्थापित करणारी, या वर्गात अग्रणी ठरणारी ब्रेकिंग यंत्रणा
  • पाच आकर्षक रंगांमध्ये, अनेकविध क्लॅडिंगच्या पर्यायांसह उपलब्ध
  • जावा ४२ एफजेच्या वितरणाचा पहिला टप्पा सुरू.

 

भारतातील ‘नियो-क्लासिक’ मोटारसायकल विभागातील प्रणेती कंपनी असलेल्या ‘जावा येझदी मोटरसायकल’ने आज जावा “42 लाइफ” लाइनअपमध्ये नवीनतम भर घालण्याच्या दृष्टीने सर्वथा नवीन असे ‘३५० जावा ४२ एफजे’ हे मॉडेल सादर केले आहे. या ब्रँडचे संस्थापक, फ्रँटिसेक जेनेसेक यांना श्रद्धांजली अर्पण करणारे हे सादरीकरण असून हा ‘जावा ४२’ या मालिकेतील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या मालिकेतील ‘४२’ आणि ‘४२ बॉबर’ यांसारख्या मॉडेल्सनी आतापर्यंत अनेक रायडर्सना मोहित केले आहे.

या व्यतिरिक्त, ‘जावा येझदी मोटरसायकल’ने पुण्यात दोन ‘जावा येझदी कॅफे’ उभे केले आहेत. या आर्थिक वर्षाच्या अखेरीस पुण्यात १० टचपॉइंट्स उभे करून नेटवर्क विस्तारण्याची कंपनीची योजना आहे. सध्याच्या नवीन कॅफे फॉरमॅटसह, या ब्रँडची शहरात आठ विक्री व सेवा टचपॉइंट्स आहेत. आपल्या या नेटवर्कचा झपाट्याने विस्तार करून त्याद्वारे पुण्याच्या मोटरसायकल संस्कृतीला बळकटी देण्याचा या ब्रँडचा उद्देश आहे.

याशिवाय, ग्राहकांचा खरेदीचा प्रवास पूर्णपणे डिजिटल आणि अखंड बनविण्यासाठी या ब्रँडने फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी केली आहे. भारतातील प्रिमियम मोटरसायकल मार्केटमध्ये हे एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून ओळखले जाते.

‘जावा येझदी मोटरसायकल’चे सह-संस्थापक अनुपम थरेजा म्हणाले, “२०२४ जावा ४२ हे मॉडेल मोटरसायकल अभियांत्रिकीमधील डिझाइनला महत्त्व देण्याच्या आमच्या दृष्टीकोनाला प्रतिबिंबित करते. आम्ही कामगिरी, शैली आणि अचूकता यांचे परिपूर्ण मिश्रण तयार करण्यासाठी ‘किंमत व कामगिरी यांच्या गुणोत्तराची सीमा पार केली आहे. भारतात निओ-क्लासिक्स मोटरसायकलींचे आम्ही प्रणेते आहोत. त्या अनुषंगाने ‘४२ एफजे’ हे मॉडेल आमच्या आव्हानात्मक भावनांना आणि नाविन्यतेच्या दृष्टीकोनाला मूर्त रूप देते. सध्या सुरू असलेल्या सणासुदीच्या दिवसांत, मोकळ्या रस्त्यांविषयीचे प्रेम आणि साहसी भावना यांनी बांधलेल्या समुदायाला एकत्र आणण्याचे आमचे ध्येय आहे. परंपरेचे, सामायिक अनुभवांचे आणि नवीन सुरुवातीचे मिश्रण हेच ‘जावा ४२ लाइफ’ मालिकेचे खरे सार आहे.”

या मोटारसायकलचे नाव जावाचे दूरदर्शी संस्थापक फ्रँटिसेक जेनेसेक यांच्यापासून प्रेरित आहे. आजच्या मोटरसायकल रायडर्ससाठी एक धाडसी, आधुनिक राइडिंगचा अनुभव प्रदान करण्याचा यामागे उद्देश आहे. ‘जावा ४२ लाइफ’ मालिकेत हे नवीन मॉडेल सादर करून, ‘जावा’ने २०२४ या वर्षात नवीन मानके प्रस्थापित करण्यासाठी डिझाइन, शक्ती, बाजारातील उपस्थिती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा संयोग साधला आहे.

उत्पादनाची वैशिष्ट्ये :

जबरदस्त डिझाइन

‘३५० जावा ४२ एफजे’ हे नवे मॉडेल जुन्या क्लासिक जावाची आठवण करून देते आणि निओ-क्लासिक मोटरसायकल असे रूप धारण करते. अॅनोडाइज्ड, ब्रश्ड ॲल्युमिनियम फ्युएल टँक क्लॅडिंग हे या मोटरसायकलचे सर्वात वेगळे वैशिष्ट्य आहे. या प्रकारच्या मोटरसायकलींमध्ये ते प्रथमच सादर झाले आहे. या फिनिशमुळे या बाइकविषयीचे आकर्षण वाढले आहे. विविध रंगांचे उपलब्ध पर्याय आणि जावा ब्रँडिंगचे पर्याय यांच्या माध्यमातून ग्राहकांना आपले वैयक्तिकरण करण्यास वाव मिळतो.

टँक क्लॅडिंगला पूरक असणारे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ॲल्युमिनियम हेडलॅम्प होल्डर, ग्रॅब हँडल्स आणि ॲल्युमिनियम फूट पेग्स! मोटरसायकलमधील हे घटक आधुनिक कारागिरी दर्शवितात, त्याचबरोबर ‘जावा’चा वारसाही प्रदर्शित करतात.

गोलाकार रचना आणि काळी आकृती ही ४२ एफजे मालिकेची वैशिष्ट्ये ‘जावा’चा समृद्ध वारसा जपतात. ‘ऑफ-सेट फ्युएल कॅप’मुळे पेट्रोलच्या टाकीच्या डिझाइनला एक अनोखा टच मिळतो. या मोटरसायकलचे रुंद, सपाट सीट रायडरला आराम देते. त्याच्या प्रीमियम स्टिचिंगसह ते विशिष्ट स्टाईलही राखते.

मूळ ‘जावा’ची आठवण करून देत असलेल्या या नवीन मॉडेलमध्ये काळानुरूप अनेक आधुनिक वैशिष्ट्यांचाबी समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ‘जावा’चा तो परिचित आवाज निर्माण करणारा, वरच्या बाजूस कललेला एक्झॉस्ट पाईप आहे. तसेच एलईडी लाइटिंगचे पॅकेजही यात देण्यात आले आहे. संपूर्ण डिजिटल असलेले इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, यूएसबी चार्जिंग पोर्ट यांमुळे रायडरला आवश्यक त्या सुविधा मिळतात. सध्याचे तंत्रज्ञान आणि पारंपारिक सौंदर्य यांचे हे अनोखे मिश्रण खूपच आकर्षक आहे.

‘३५० जावा ४२ एफजे’ हिचे डिझाईन ब्रँडची बांधिलकी दर्शवते. क्लासिक मोटरसायकलच्या चाहत्यांना आणि समकालीन वैशिष्ट्यांची प्रशंसा करणाऱ्यांना आकर्षित करणारा राइडिंग उत्कृष्ट अनुभव ही बाईक देते.

जबरदस्त इंजिन आणि कामगिरी

‘जावा ४२ एफजे’च्या केंद्रस्थानी नवीन अत्याधुनिक ‘३५० अल्फा-२’ हे इंजिन आहे. या पॉवरहाऊसमधून २९.२ पीएस आणि २९.६ एनएम इतकी शक्ती निर्माण होते. उत्कृष्ट अॅक्सरलेशन, स्मार्ट गियर-आधारित मॅपिंग, सिक्स-स्पीड गिअरबॉक्स आणि ‘ए अॅंड एस’ क्लच तंत्रज्ञान अशी या मोटरसायकलची दमदार वैशिष्ट्ये आहेत. मुळात ‘४२ एफजे’ची रचनाच दमदार कामगिरीसाठी करण्यात आलेली आहे. त्यामुळेच निओ-क्लासिक सेगमेंटमध्ये ती एक जबरदस्त शक्ती ठरते.

‘४२ एफजे’ उत्तम प्रकारे हाताळता यावी, म्हणून ती डबल-क्रेडल फ्रेमवर बांधण्यात आली आहे. महामार्गांवर स्थिरपणे चालावी व नियंत्रण राखता यावे, याकरीता तिला मोठी, १४४० मिमीची चाके देण्यात आली आहेत. तिचा ग्राउंड क्लीयरन्स १७८ मिमी इतका आहे. त्यामुळे कोणत्याही खडबडीत रस्त्यावर ती जाऊ शकते. या सेगमेंटच्या बाईक्समध्ये इतका ग्राउंड क्लीयरन्स सहसा मिळत नाही. ‘ड्युअल-चॅनल एबीएस’चे मोठे डिस्क ब्रेक असल्याने ही बाईक पाहिजे तेव्हा अचूक ठिकाणी थांबू शकते. त्यामुळे रायडरची सुरक्षा जपली जाते व त्याला आत्मविश्वास मिळतो प्रीमियम डायमंड-कट अलॉय व्हील्स व त्यांवर ट्यूबलेस टायर्स यांमुळे रायडरला मोठी सुविधा मिळते.

‘४२ लाइफ’ मालिकेचे सुयोग्य प्रतिनिधित्व

नवीन ‘३५० जावा ४२ एफजे’ मोटरसायकल ही या ब्रँडच्या निओ-क्लासिक लाइन-अपमधील सर्वात नवीन आवृत्ती आहे. लोकप्रिय ठरलेल्या ‘४२’ आणि ‘४२ बॉबर’मध्ये ती सामील झाली आहे आणि या शक्तीशाली, आधुनिक वैशिष्ट्यांनी युक्त अशी ही बाईक स्वतःचे चाहते निर्माण करण्यासासाठी सज्ज झाली आहे.

‘जावा ४२ एफजे’ हे मॉडेल प्रीमियम रंगांमध्ये उपलब्ध आहे. तिची किंमत २,००,१४२ रुपयांपासून सुरू होते (एक्स-शोरूम, पुणे).

या मॉडेलच्या सर्व प्रकारांची तपशीलवार किंमत पुढीलप्रमाणे :

मॉडेल प्रकार रंग किंमत (एक्स-शोरूम, पुणे).
जावा ४२ एफजे ड्युएल चॅनेल एबिएस, अलॉय डीप ब्लॅक मॅट रेड क्लॅड रु. २,२१,१४२
जावा ४२ एफजे ड्युएल चॅनेल एबिएस, अलॉय डीप ब्लॅक मॅट ब्लॅक क्लॅड रु. २,२१,१४२
जावा ४२ एफजे ड्युएल चॅनेल एबिएस, अलॉय रॉस्मो ब्लू मॅट रु. २,१६,१४२
जावा ४२ एफजे ड्युएल चॅनेल एबिएस, अलॉय मिस्टिक कॉपर रु. २,१६,१४२
जावा ४२ एफजे ड्युएल चॅनेल एबिएस, अलॉय ऑरोरा ग्रीन मॅट रु. २,११,१४२
जावा ४२ एफजे ड्युएल चॅनेल एबिएस, स्पोक ऑरोरा ग्रीन मॅट स्पोक रु. २,००,१४२