भारतातील आघाडीचा विविध व्यवसाय समूह मलाबार ग्रुपने मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) भारत डायमंड बोअर्समध्ये झालेल्या एका समारंभात आपला राष्ट्रीय शिष्यवृत्ती कार्यक्रम जाहीर केला. मलाबार ग्रुप ही मलाबार गोल्ड अँड डायमंड्सची पालक कंपनी आहे. या घोषणेमुळे समूहाच्या फ्लॅगशिप सीएसआर उपक्रमातील एक लक्षणीय टप्पा गाठला गेला आहे.
मलाबार स्कॉलरशिप प्रोग्राममुळे मुलींच्या शिक्षणाला सहाय्य करण्याप्रती कंपनीची बांधिलकी दिसून येते. या सोहळ्याचे उद्घाटन माननीय वाणिज्य व उद्योग मंत्री श्री. पीयूष गोयल यांच्या हस्ते झाले. त्यावेळी एम. पी. अहाम्मद (अध्यक्ष- मलाबार ग्रुप), अशेर ओ (व्यवस्थापकीय संचालक- इंडिया ऑपरेशन्स, मलाबार ग्रुप) आणि अब्दुल सलाम के पी (उपाध्यक्ष- मलाबार ग्रुप),
निषाद एके (कार्यकारी संचालक, मलबार ग्रुप) आणि शौनक पारीख (संचालक, महेंद्र ब्रदर्स) यांच्यासह कंपनीतील अनेक उच्चपदस्थ अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावर्षी शिष्यवृत्ती कार्यक्रमाद्वारे भारतभरातील २१,००० हून अधिक मुलींच्या शिक्षणासाठी १६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मलाबार ग्रुपचे अध्यक्ष एमपी अहमद या उपक्रमाबद्दल म्हणाले, “शिक्षण हे जग बदलण्यासाठी सर्वांत शक्तिशाली साधन आहे. शिक्षण संधी खुल्या करते आणि आयुष्यामध्ये कायापालट घडवून आणते यावर मलाबार ग्रुपचा सखोल विश्वास आहे आणि त्याचे थेट प्रतिबिंब आमच्या शिष्यवृत्ती कार्यक्रमात दिसून येते. तरुण मुलींच्या शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी आम्ही बांधील आहोत, जेणेकरून त्यांना त्यांच्या शैक्षणिक आकांक्षा पूर्ण करता येतील आणि समाजाला अर्थपूर्ण योगदान देता येईल.”
२००७ मध्ये सुरू करण्यात आलेला मलाबार नॅशनल स्कॉलरशिप प्रोग्राम समूहाच्या सीएसआर चौकटीतील फ्लॅगशिप उपक्रम आहे. आजवर ६० कोटी रुपयांहून अधिक निधी या कार्यक्रमात गुंतवण्यात आला आहे. त्यातून भारतभरातील ९५,००० विद्यार्थिनींना आर्थिक मदत पुरवली जात आहे. मुलींच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करून केवळ व्यक्ती नव्हे तर समुदायांची उन्नती करण्याचे उद्दिष्ट मलाबार ग्रुपने ठेवले आहे. त्यामुळे भविष्यकाळातील पिढ्या सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी सुसज्ज होणार आहेत.
समूहाच्या सीएसआर उपक्रमांचे उद्दिष्ट सीमांत समुदायांची उन्नती हेच आहे. यामध्ये वंचितांना वैद्यकीय मदत पुरवणे, घर बांधण्यासाठी मदत पुरवणे आणि गरजू स्त्रियांच्या लग्नांसाठी आर्थिक मदत पुरवणे यांचा समावेश होतो. आजच्या तारखेला मलाबार ग्रुपने विविध सामाजिक दायीत्व प्रकल्पांमध्ये २६३ कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. यातून शाश्वत विकासाप्रती समूहाची बांधिलकी दिसून येते.
शिक्षण व उपासमारीपासून मुक्तता यांसारख्या प्रभावी उपक्रमांवर मलाबार ग्रुप सातत्याने लक्ष केंद्रित करत आहे. समुदाय सक्षम होतील आणि त्यांना शक्य त्या सर्व मार्गांनी आधार मिळेल तेव्हाच शाश्वत वाढ शक्य होईल यावर कंपनीचा ठाम विश्वास आहे. हाच विश्वास या उपक्रमांमधून दिसून येतो. समूह आपला व्यवसाय व सामाजिक दायित्व उपक्रम दोन्हींचा विस्तार करत असल्यामुळे हेच समर्पण समूहाच्या भविष्यकाळातील प्रत्येक प्रयत्नाच्या केंद्रस्थानी असेल.