हडपसर येथील 7 टून बिट्स म्युझिक अकादमी अँड स्टोअरच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी
विविध वाद्यांचे वादन करत उपस्थित रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. या अकादमीमधून अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. अनेक स्पर्धांमध्ये यश संपादन करत आहेत.
आयुष्यामध्ये शिक्षणाला अधिक महत्त्व असले तरी त्यासाठी कष्टाची तयारी ठेवावी लागते. त्याचं प्रमाणे
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध गुण असणे आवश्यक आहे. त्यात संगीत हे माणसाला अधिक समृध्द करते, असे प्रतिपादन वाडिया महाविदयालयाच्या प्रा. विदया खाडे – जायभाय यांनी केले. अकादमीच्या माध्यमातून आतापर्यंत 450 विद्यार्थ्यांनी संगीताचे शिक्षण घेतले आहे.