बीएसएने भारतात लाँच केली गोल्ड स्टार 650 मोटारसायकल

मुंबई, ऑगस्ट 2024 – क्लासिक लिजेंट्सने भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनी भारतातील सर्वात मोठ्या मोटारसायकल ब्रँडपैकी एक असलेल्या बीएसए लॉन्च करण्याची घोषणा केली. बर्मिंगहॅम स्मॉल आर्म्स कंपनी (बीएसए), एके काळी जगातील सर्वात मोठी मोटारसायकल उत्पादक होती आणि ब्रिटिश औद्योगिक वारशाचा आधारस्तंभ होती. 1861 मध्ये स्थापन झाल्यापासूनचे त्यांचे चाहते फॉलोअर्स आजपर्यंत आहेत.

  • बीएसए गोल्ड स्टारमध्ये आधुनिक अभियांत्रिकी आविष्कारासह क्लासिक डिझाइनही आहे. ही गाडी भारतात लॉन्च केली असून, तिची प्रास्ताविक किंमत रु. 2.99 लाख (एक्सशोरूम दिल्लीआहे.
  • भारतातील सर्वात मोठी सिंगल : 652cc लिक्विड कूल्ड आणि या विभागातील 55 एनएम टॉर्क अशी सर्वाधिक पॉवर
  • जागतिक प्रीमियम कंपोनंट्स : ब्रेम्बो ब्रेक, ड्युअल-चॅनल एबीएस, एक्सेल रिम्स, पिरेली टायर्स आणि लाफ्रान्सद्वारे गोल्ड स्टार इंसिग्निया.
  • देशव्यापी समर्थन : विस्तृत नेटवर्क डीलरशिप आणि सेवा केंद्रे संपूर्ण भारतात.

बीएसएने ब्रिटिश मोटारसायकल अभियांत्रिकीच्या ‘गोल्ड स्टँडर्ड’ या आयकॉनिक गोल्ड स्टारसह भारतात प्रवेश केला आहे. बीएसए गोल्ड स्टार 650 ने 2021 मध्ये यूकेमध्ये पुनरागमन केले. त्यानंतर, युरोप, तुर्की, न्यूझीलंड आणि फिलीपिन्समध्ये यश मिळविले आहे. आता भारतीय मोटारसायकलप्रेमींच्या मनात घर करण्यासाठी बीएसए सज्ज झाले आहे. बीएसए लवकरच यूएस, ऑस्ट्रेलिया आणि जपानमध्ये प्रवेश करण्यास तयार आहे.

यावेळी बोलताना महिंद्रा समूहाचे अध्यक्ष श्रीआनंद महिंद्रा म्हणाले, “बीएसए भारतात आणणे, म्हणजे जागतिक मोटारसायकल इतिहासाचा एक भाग भारतासोबत जोडण्यासारखे आहेयुद्धाच्या झळा सोसत तयार झालेल्या या ब्रँडबद्दल सर्वांमध्ये जिव्हाळ्याची भावना असूनही भावनाच गोल्ड स्टारमध्ये अंतर्भूत आहेया गोल्ड स्टारचा अनुभव घेण्याची संधी तुम्हा सर्वांना मिळेल.”

बीएसए गोल्ड स्टार मोटारसायकल उत्कृष्टतेचे मूर्त रूप आहे, ” असे  क्लासिक लिजेंड्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​सहसंस्थापक अनुपम थरेजा यांनी सांगितेल. ते म्हणाले की, टँकच्या आकारापासून ते इंजिनच्या मोठ्या सिंगल कॅरेक्टरपर्यंत प्रत्येक तपशीलबीएसएच्या सुवर्णयुगाची आठवण करून देण्यासाठी बारकाईने तयार केला गेला आहे आणि जागतिक ब्रँडला साजेशी कामगिरीविश्वासार्हता आणि नावीन्यपूर्णता यात आहेजगभरातील अनेक पिढ्यांसाठी सुवर्ण मानक असलेल्या या वारशाला जिवंत ठेवण्यासाठी आम्ही यात आमचा जीव ओतला आहे. ” 

 गोल्ड स्टारभारतातील सर्वात एलिजिबल सिंगल

बीएसए गोल्ड स्टारच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये यांचा समावेश आहे:

  • भारतातील सर्वात मोठा सिंगल सिलिंडर: लिक्विड कूल्ड 652cc इंजिन
  • या श्रेणीतील सर्वोत्तम 55Nm आणि 45.6PS, गोल्ड स्टार-योग्य कामगिरी
  • सर्वोत्तम श्रेणीतील कंपोनन्ट्स : ब्रेम्बो ब्रेक्स ड्युअल चॅनेल एबीएस, ॲल्युमिनियमसह एक्सेल रिम्स आणि पिरेली टायर
  • क्लासिक अंडरस्टेट ब्रिटिश स्टाईल आधुनिक वैशिष्ट्ये आणि डिजिटल-एनालॉग इन्स्ट्रुमेंटेशनने पूरक
  • सिल्व्हर शीन लेगसी एडिशनसह सहा आकर्षक रंगांचे पर्याय

बीएसएचे भारतातील प्रमुख चार्ज गोल्ड स्टार आहे, हे नाव जागतिक स्तरावर मोटारसायकलच्या शौकिनांना आकर्षित करते. मूळ गोल्ड स्टार, 1938 मध्ये ब्रिटनमध्ये जन्माला आला. त्याने वेगाचे अनेक विक्रम प्रस्थापित केले आणि रेसिंग सर्किट्सवर प्रभुत्व मिळविले. त्याच्या काळातील परफॉर्मन्स मोटारसायकलसाठी ‘गोल्ड स्टँडर्ड’ बनले.

नवीन बीएसए गोल्ड स्टार एक आधुनिक क्लासिक आणि डिझाइन आयकॉन आहे. तेच वैभव पुन्हा मिळविण्यासाठी पुनरागमन करत आहे. ब्रिटिशांच्या नेतृत्वाखालील रेडलाइन स्टुडिओ आणि रिकार्डोच्या अभियांत्रिकी डिझाइनसह काळजीपूर्वक तयार केले गेले होते. ग्राझच्या तांत्रिक विद्यापीठाच्या इंजिन कौशल्याने पूरक असलेली ही गाडी आहे. ब्रिटिश अभियांत्रिकी वारसा आणि जागतिक तांत्रिक उत्कृष्टतेचे यात मिश्रण आहे.

 बीएसए गोल्ड स्टार ब्रिटिश अभियांत्रिकीच्या सर्वोच्च कामगिरीचे उदाहरण आहे. आधुनिक वैशिष्ट्यांसह क्लासिक डिझाइनही यात आहे. 12V सॉकेट आणि यूएसबी चार्जिंग पोर्टही यात आहे. त्यामुळे लांब प्रवासादरम्यान रायडर्स कनेक्ट राहू शकतील व मोबाइल चार्ज करू शकतील. बाइकच्या रायडर केंद्रित डिझाइनमध्ये वैयक्तिक आरामासाठी सहजपणे समायोजित करण्यायोग्य मागील शॉक्सचा समावेश आहे. यातील गुणवत्ता आणि बारीकसारीक गोष्टी हे बीएसएच्या ब्रिटिश कारागिरीचा आणि उत्कृष्टतेचा नमुना आहे. यातून गोल्ड स्टार बीएसएच्या वारसा खऱ्या अर्थाने दिसून येतो.

उपलब्धता

भारतीय ग्राहकांसाठी पूर्ण सहकार्य सुनिश्चित करून, डीलरशिप आणि सेवा केंद्रांचे देशव्यापी नेटवर्क तयार करण्याची बीएसए योजना आखत आहे. मोटारसायकल डिझाइन आणि तंत्रज्ञानामध्ये सतत नावीन्य आणण्यावर कंपनीचा भर आहे. गाडीतील ब्रिटिशपण जपत भारतातील आपली श्रेणी वाढविण्याची कंपनीची योजना आहे. भारतीय अभियांत्रिकी प्रतिभेसह सहयोग करून, ब्रिटिश परंपरेचे स्थानिक कौशल्यासह मिश्रण करणे, भारतीय बाजारपेठेसाठी एक अद्वितीय फ्युजन तयार करणे हे बीएसएचे उद्दिष्ट आहे.

बीएसए गोल्ड स्टार 15 ऑगस्ट 2024 पासून भारतभरातील निवडक डीलरशिपवर उपलब्ध होईल. किंमती 2.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) पुढे असेल.

Sr. No. Model Name Price (Ex-Showroom Delhi)
1 Highland Green Rs. 2,99,990
2 Insignia Red Rs. 2,99,990
3 Midnight Black Rs. 3,11,990
4 Dawn Silver Rs. 3,11,990
5 Shadow Black Rs. 3,15,990
6 Legacy Edition – Sheen Silver Rs. 3,34,990