एफडीसीआयच्या ह्युंदाई इंडिया कूट्यूर वीकमध्ये शेरवानीतील बॉलीवूड विकी कौशलची प्रेक्षकांना भुरळ

भारतीय कारागिरी आणि कलेचा आनंदोत्सव असलेल्या एफडीसीआयच्या ह्युंदाई इंडिया कूट्यूर वीक २०२४ च्या ग्रँड फिनालेमध्ये बॉलीवूड स्टार विकी कौशलने प्रेक्षकांना भुरळ पाडली.

जागतिक लक्झरी ब्रँड असलेल्या फाल्गुनी शेन पिकॉक (एफएसपी) यांच्या सहकार्याने स्वदेश यांनी घडविलेली चमकदार शेरवानी त्याने घातली होती. यावेळी केवळ पारंपरिक भारतीय वस्त्रोद्योगाचे सौंदर्यच अधोरेखित नाही झाले तर भारताच्या समृद्ध कारागिरीच्या वारशाला पुढे नेण्यासाठी स्वदेशचे समर्पणही दिसून आले.

उत्कृष्ट बनारसी ब्रोकेडपासून तयार केलेल्या या शेरवानीमध्ये नाजूक फुलांचे पॅटर्न आणि नाजूक मण्यांचे भरतकाम आहे. अशा प्रत्येक तपशिलातून स्वदेशच्या विणकरांचे अप्रतिम कौशल्य प्रतिबिंबित होते. त्यांनी असामान्य भव्यता आणि सुसंस्कृतपणाचे वस्त्र तयार करण्यासाठी पारंपारिक कडूवा तंत्राचा वापर केला. हे सहकार्य म्हणजे एफएसपीचे भारतीय विणकामातील पहिले पाऊल होय आणि त्यातून येथील प्रादेशिक कारागिरांच्या कुशल कलात्मकतेवर प्रकाशझोत पडला आहे.

स्वदेश हा रिलायन्स रिटेलचा उपक्रम असून त्यामागे रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा श्रीमती नीता अंबानी यांची प्रेरणा आहे. भारताच्या समृद्ध हस्तकला परंपरांचे जतन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी तो कटिबद्ध आहे. कारागिरांना जागतिक मंच प्रदान करून स्वदेशी कला आणि कारागिरीला उन्नत करण्याचे स्वदेशचे उद्दिष्ट आहे.

या ब्रँडचे हैदराबादमधील २०,००० चौरस फुटांचे फ्लॅगशिप स्टोअर, मुंबईतील त्याचे कंसेप्ट स्टोअर आणि एनएमएसीसी येथे कारागीर प्रात्यक्षिक मंडप आणि पॅरिस ऑलिंपिकमधील द इंडिया हाऊसमधील पॅव्हेलियन हे हस्तकलेचे कपडे आणि लक्झरीच्या स्पर्शासह उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी गतिमान केंद्र म्हणून काम करतात.

राजधानीत आयोजित केलेल्या फिनालेमध्ये स्वदेश आणि एफएसपी यांनी नवीन कॅप्सूल कलेक्शनसुद्धा सादर केले. यात पारंपरिक तंत्रांसह समकालीन कूट्यूरचा मिलाफ होता. या कलेक्शनमध्ये कांजीवरम सिल्कने विणलेल्या आणि खऱ्या सोने व चांदीच्या जरीच्या धाग्यांनी, बनारसी ब्रोकेड लेहेंगा आणि चिकनकारीच्या तुकड्यांसह सुशोभित केलेल्या साड्या होत्या. एफएसपी मोनोग्रामने सुशोभित असलेली प्रत्येक वस्तू ही कालातीत भारतीय कारागिरीसह आधुनिक डिझाईनचा सहज मिलाफ होता.