पुणे : भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजने शैक्षणिक वर्ष २०२४ -२५ साठी बीबीए एलएलबी अभ्यासक्रमाची घोषणा केली आहे. बीबीए एलएलबी साठी प्रवेश परीक्षा २४ ऑगस्ट रोजी आहे,त्यासाठी २२ ऑगस्ट ही नाव नोंदणीची अंतिम मुदत आहे. अधिक माहिती ८०१०९७७०१० या दूरध्वनी क्रमांकावर तसेच nlcpune@bharatividyapeeth.edu या ठिकाणी ईमेल करून मिळू शकेल.हा अभ्यासक्रम ५ वर्षाचा आहे.या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी एमएचसीईटी परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठ विधी शाखेच्या अधिष्ठाता आणि न्यू लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ उज्वला बेंडाळे यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.