एस.पी. कॉलेज चौकात गुलाबो गँगचे तीव्र आंदोलन; भोंदू बाबाविरोधात कठोर कारवाईची मागणी

By: Editor_Pratik

On: Monday, March 30, 2026 1:01 PM

Google News
Follow Us

पुणे, प्रतिनिधी :

शहरातील एस.पी. कॉलेज चौकात आज गुलाबो गँगच्या वतीने स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरात याच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. महिलांची फसवणूक, अंधश्रद्धेच्या नावाखाली मानसिक व सामाजिक शोषण केल्याचा आरोप करत आंदोलकांनी संताप व्यक्त केला.

या आंदोलनादरम्यान प्रतीकात्मक तिरडी काढण्यात आली. तसेच निषेध म्हणून संबंधित व्यक्तीच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले आणि चपलांचा हार घालून तीव्र निषेध नोंदवण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचा इशारा दिला.

या वेळी आंदोलकांनी काही ठोस मागण्या मांडल्या. त्यामध्ये अशोक खरात याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी व कठोर कायदेशीर कारवाई करावी, रूपाली चाकणकर यांना सहआरोपी म्हणून चौकशी करून अटक करावी, तसेच या प्रकरणात नैतिक जबाबदारी स्वीकारत नीलम गो-हे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

हे आंदोलन पायल तिवारी बिटिया फाउंडेशन व गुलाबो गॅंगच्या अध्यक्षा संगीता तिवारी यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “महिलांच्या आयुष्याशी खेळणाऱ्यांना आम्ही माफ करणार नाही. कायदा आणि प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.”

दरम्यान, या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून सखोल चौकशी व कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच आंदोलनकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर पोस्टकार्ड मोहिम राबवूनही न्याय मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

या आंदोलनात शोभना पण्णिकर, पूजा पाटील चव्हाण, प्रिया पाटील सूर्यवंशी, सोनिया ओव्हाळ, सारिका शिंदे, भारती लोंढे, पारूल ताई, शुभा वाफारे, मालन चव्हाण, सुवर्णा माने, शुभांगी वखारे यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.

जर तात्काळ कारवाई झाली नाही, तर येत्या काळात राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला असून प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

September 20, 2026

September 15, 2026

September 12, 2026

September 4, 2026

September 4, 2026

September 4, 2026