हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे जिल्ह्यात निवेदन ! 

By: Editor _2

On: Monday, August 5, 2024 12:22 PM

Google News
Follow Us

यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्‍या नराधमाला भरचौकात फाशी द्या आणि तात्काळ ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करा !

पुणे – यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करणार्‍या नराधमाला भरचौकात फाशी द्या आणि हिंदु तरुणींचे संरक्षण होण्यासाठी राज्यात तात्काळ ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करा या मागणीसाठी पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी निवेदने देण्यात आली. ३ ऑगस्ट या दिवशी मंचर येथील प्रांत कार्यालयात निवेदन  देण्यात आले. यावेळी निवेदन देण्यासाठी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे धर्माभिमानी श्री.योगेश पिंगळे महाराज, श्री.यादव चासकर,श्री.अमोल ढगे,वाळूंजवाडीचे सरपंच श्री.नवनाथ वाळूंज,श्री.नामदेव आण्णा खैरे, श्री.मार्तंड डेरे, श्री.सुशांत थोरात हे उपस्थित होते.

    तसेच ५ ऑगस्ट या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने पुणे जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अधिवक्ता सीमा साळुंखे यांच्यासह रणरागिणीच्या कु. क्रांती पेटकर आणि अन्य महिला उपस्थित होत्या.

 

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now