समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांच्‍या वतीने पुणे येथे मूकनिर्दशने

By: Editor _2

On: Monday, August 19, 2024 4:35 PM

Google News
Follow Us

अंधश्रद्धा निर्मूलनाच्‍या नावाखाली छुप्‍या अर्बन नक्षलवादाला पाठिंबा देणार्‍यांच्‍या विरोधात पुणे येथे हिंदुत्‍वनिष्‍ठांची मूकनिर्दशने !

हिंदु संतांनी अंधश्रद्धेविरुद्ध प्रचंड समाजजागृती केली आहे; मात्र हिंदु संत, भाविक यांना ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’वाले  भोंदू ठरवून त्‍यांची समाजात बदनामीे करत आहेत. खरे यांच्‍या स्‍वत:च्‍या ट्रस्‍टमध्‍ये केलेल्‍या कोट्यवधींच्‍या घोटाळ्‍याची चौकशी चालू आहे. अंनिसचे कार्यकर्ते नक्षलवादी म्‍हणून पकडले गेले आहेत; एकूणच अंधश्रद्धा निर्मूलनाच्‍या नावाखाली छुप्‍या अर्बन नक्षलवादाला पाठिंबा देणार्‍यांच्‍या विरोधात समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांच्‍या वतीने पुणे येथे दिनांक १८ ऑगस्ट रोजी मूकनिर्दशने करण्‍यात आली.

या वेळी हातात ‘भावी पिढीला नास्‍तिक आणि राष्‍ट्रिवराधेी बनवू पहाणार्‍या ‘कम्‍यिुनस्‍ट इकािेसस्‍टिम’च्‍या विराधेात कतृीशील व्‍हा!’, ‘नक्षलवादाशी संबंध असल्‍यामुळे अंनिसच्‍या लोकांना अटक का होते ?’, ‘छुपा नक्षलवाद म्‍हणजे देशद्रोह्यांना उमेदवारी व फुटीरतावाद्यांचा सन्‍मान’, ‘राष्‍ट्रप्रेमी भारतियांनो, कम्‍युनिस्‍ट, सेक्‍युलर आणि जिहादी यांच्‍या राष्‍ट्रघातकी युतीविरुद्ध संघटित व्‍हा !’, असे विविध फलक घेऊन हिंदुत्‍वनिष्‍ठ सहभागी झाले होते.

या वेळी भूमिका मांडतांना श्री. पराग गोखले म्‍हणाले की, ‘होळीची पोळी गरिबांना द्या’, म्‍हणणारे अंनिसवाले ईदची लाखो पशूंची कुर्बानी आणि चर्चबाहेर वाया जाणार्‍या मेणबत्त्या यांविषयी गप्‍प बसतात. वर्ष २०११ मध्‍ये गृह विभागाने काढलेल्‍या, नक्षलवाद्यांना साहाय्‍य करणार्‍या संस्‍थांच्‍या सूचीत अंनिसचे नाव होते. त्‍यांच्‍या कार्यकर्त्‍यांना नक्षलवादी कारवायांतील सहभागासाठी अटक झाली होती. श्‍याम मानव यांना खोटे लिखाण केल्‍याबद्दल त्‍यांना न्‍यायालयाने शिक्षा केली होती. मानव यांनी हल्लीच ‘उपमुख्‍यमंत्री श्री. फडणवीस यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्‍यावर दबाव आणला’, असे राजकीय आरोप केले. ‘जेएन्‌यु’मध्‍ये ‘भारत तेरे तुकडे होंगे’, अशा घोषणा देण्‍याचा आरोप असणार्‍या कन्‍हैयाकुमार याला काँग्रेससारख्‍या राष्‍ट्रीय पक्षाने उमेदवारी दिली. यातून पुरोगाम्‍यांची खरी भूमिका अर्बन नक्षलवादाला साहाय्‍यक आहे हे लक्षात येते. ही कुकृत्‍ये ‘कम्‍युनिस्‍टांची इकोसिस्‍टम’ दर्शवतात. भावी पिढी नास्‍तिक व राष्‍ट्रविरोधी बनवू पहाणार्‍या पुरोगाम्‍यांच्‍या कुकृत्‍याचा बुरखा फाडणे हे प्रत्‍येक राष्‍ट्रप्रेमीचे कर्तव्‍यच आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

April 21, 2026

Malabar मलबार

April 20, 2026

April 18, 2026

April 17, 2026

April 16, 2026

April 16, 2026