पुणे येथे भोर,पारगाव,मंचर,सिंहगड रस्ता,हडपसर आदींसह ८ ठिकाणी विशाळगड अतिक्रमणमुक्ती साठी मूकनिदर्शने !
पुणे – छत्रपती शिवाजी महाराज आणि असंख्य मावळे यांनी प्राणाचे बलिदान देऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करून धर्मरक्षण केले आज त्याच गडांवर अतिक्रमणे होत आहेत, विशाळगडसह सर्वच गडकिल्ले अतिक्रमणमुक्त करण्यात व्हावेत या उद्देशाने तसेच हिंदूंवर गुन्हे नोंद करून करण्यात आलेली कारवाई रहित करावी या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी मुकनिदर्शने करण्यात आली.मुसळधार पाऊस असूनही खूप मोठ्या संख्येने धर्मप्रेमीं सहभागी झाले होते.
२ ऑगस्ट या दिवशी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक, पारगाव फाटा, पारगाव (सा.मा.), तालुका दौंड, पुणे येथे मूक आंदोलन घेण्यात आले. यावेळी श्री. शामराव आबा ताकवणे (तंटामुक्ती अध्यक्ष, पारगाव सालू मालू), संतराज अर्थमुव्हर्स चे श्री. प्रशांत बोत्रे, मोरया उद्योग समूहाचे चेअरमन श्री.सागर ताकवणे यांसह अनेकाकांनी यामध्ये सहभाग घेतला.
२ ऑगस्ट या दिवशी मंचर येथेही छत्रपती शिवाजी महाराज चौकात मूक निदर्शने करून आंदोलन घेण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. नामदेव आण्णा खैरे, उद्योजक श्री. शंकरशेठ पटेल, कमलजादेवी देवस्थानाचे विश्वस्त श्री. मार्तंड डेरे, तपनेश्वर देवस्थानचे विश्वस्त श्री. संतोष बाणखेले आदी मान्यवरांसह २५ हून अधिक हिंदुत्वनिष्ठ आंदोलनात सहभागी झाले होते.
३ ऑगस्ट या दिवशी शिवतीर्थ, चौपाटी, भोर, पुणे येथे मूक आंदोलन घेण्यात आले. यावेळी भोर व्यापारी संघटनेचे श्री.अमोल शहा, वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज श्री. संदेश देशपांडे, धारकरी श्री. राहुल शिंदे, श्री. साळुंखे, राजगड ज्ञानपीठ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राध्यापक श्री. काकासाहेब कोरे, सनातन संस्थेचे प्राध्यापक श्री. विठ्ठल जाधव, हिंदु जनजागृती समितीचे प्रा.श्रीकांत बोराटे आणि कार्यकर्ते तसेच अनेक धर्मप्रेमी उपस्थित होते.
३ ऑगस्ट या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, थोरात उद्यानासमोर कोथरुड येथेही मूक आंदोलन घेण्यात आले.या ठिकाणीही अनेक धर्मप्रेमी सहभागी झाले होते.
४ ऑगस्ट या दिवशी सिंहगड रस्ता येथील राजाराम पुलाजवळ हे आंदोलन घेण्यात आले. मारुती मंदिर चौक,तळेगाव दाभाडे येथे,अलका टॉकीज चौक या ठिकाणीही मूक आंदोलन घेण्यात आले. ठीकठिकाणी झालेल्या आंदोलनात धर्मप्रेमींचा उस्फुर्त सहभाग लाभला. तसेच हडपसर येथे हडपसर वेशीजवळ, पुलाखाली हे आंदोलन घेण्यात आले.वारकरी संप्रदायाचे श्री. विजय साळुंखे महाराज आणि अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मुसळधार पाऊस असूनही धर्मप्रेमींआंदोलनात सहभागी झाले होते.रस्त्यावरून जाणारे अनेक नागरिक जिज्ञासेने धर्मप्रेमींनी हातात धरलेल्या फलकावरील मजकूर वाचत होते आणि समर्थन देत होते.अशी माहिती समितीचे श्री. पराग गोखले यांनी दिली.