मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या ब्रिटनमधील विस्ताराला मजबूती; लेस्टर येथे दुसरे शोरूम सुरु

जागतिक स्तरावर १३ देशांमधील ३५० शोरूम्सच्या किरकोळ उपस्थितीसह जगातील सहाव्या क्रमांकाचे सर्वात मोठे दागिन्यांची किरकोळ विक्रेते असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने, लेस्टर येथे ब्रिटनमधील त्यांच्या दुसऱ्या शोरूमचे नुकतेच उद्घाटन केले. मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे व्यवस्थापकीय संचालक – आंतरराष्ट्रीय कार्यभार श्री. शामलाल अहमद यांच्या उपस्थितीत लेस्टर शहराचे महापौर पीटर सॉल्सबी यांच्या हस्ते नवीन शोरूमचे उद्घाटन करण्यात आले.

श्री, मोहम्मद झियाद, कार्यभार प्रमुख – ब्रिटन आणि युरोप, मलाबार गोल्ड अँड डायमंड्स; श्री, संतोष टी, प्रदेश प्रमुख, मलाबार गोल्ड अँड डायमंड्स; श्री. नौफल थडाथिल, क्षेत्रीय प्रमुख, मलाबार गोल्ड अँड डायमंड्स, तसेच मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे इतर व्यवस्थापन संघातील सदस्य, ग्राहक आणि हितचिंतक या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बेलग्रेव्ह रोडच्या गोल्डन माईलवर स्थित, नवीन शोरूम २,००० चौरस फुटांवर विस्तारलेले आहे आणि २० देशांतील २०,००० हून अधिक दागिन्यांचा एक प्रभावी संग्रह या ठिकाणी आहे, ज्यामध्ये वधूसाठी दागिने, खास प्रसंगी, नित्य वापराचे आणि कार्यालयीन पेहरावावर साजेसे सोने, हिरे आणि मौल्यवान रत्ने यांनी युक्त दागिन्यांचा समावेश आहे.

याप्रसंगी मलाबार समूहाचे अध्यक्ष श्री. एम पी अहमद म्हणाले. “आम्ही एक वर्षापूर्वी ब्रिटनमध्ये आमच्या लंडनमधील पहिल्या शोरूमच्या माध्यमातून आमच्या येथील व्यवसायाला सुरुवात केली आणि मला खूप अभिमान वाटतो की आम्ही आमचे दुसरे शोरूम ब्रिटनमध्ये, लेस्टरमध्ये इतक्या कमी कालावधीत सुरू करत आहोत, जे आमच्यावर ग्राहकांनी ठेवलेल्या विश्वासाला जागण्याच्या आमच्या कटिबद्धतेचा प्रत्यय देणारे आहे.

जागतिक दर्जाची उत्पादने आणि पारदर्शकता, १०० टक्के विनिमय मूल्य, आजीवन देखभाल इत्यादींसह ग्राहकांसाठी दागिने खरेदीचा अनुभव उंचावण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. प्रत्येक नवीन स्टोअर उघडल्यानंतर, जागतिक स्तरावर दागिन्यांचा अग्रगण्य किरकोळ विक्रेता बनण्याच्या आमच्या ध्येयदृष्टीच्या दिशेने आम्ही एक पाऊल पुढे सरकत जात आहोत.”

जागतिक स्तरावर भारताच्या प्रख्यात स्वदेशी कारागिरीला चालना देण्यासाठी, मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने एक महत्त्वाकांक्षी विस्तार योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये विद्यमान अस्तित्व असलेल्या प्रदेशांमध्ये अधिक शोरूमच्या प्रस्तुतीसह किरकोळ उपस्थिती मजबूत करणे, तसेच दक्षिण आफ्रिका, इजिप्त, बांगलादेश, तुर्की आणि न्यूझीलंड या सारख्या नवीन देशांमध्ये विस्तार साधणे समाविष्ट आहे.

मलाबार गोल्ड अँड डायमंड्स अतुलनीय गुणवत्ता आणि सेवेची हमी देते, १३ देशांमधील कोणत्याही शोरूममधून आजीवन देखभालाची हमी, बायबॅक, चाचणी आणि प्रमाणित हिऱ्यांसह अतुलनीय गुणवत्ता आणि सेवेची हमी, डायमंड आणि गोल्ड ज्वेलरी एक्स्चेंजवर १०० टक्के मूल्य, यूके हॉलमार्क केलेले दागिने, जबाबदार सोर्सिंग, वाजवी किंमत धोरण आणि उचित श्रम पद्धती आणि अतुलनीय दागिने खरेदीचा अनुभव देण्यासाठी मलाबार जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे.