पावसाळ्याच्या आगमनासह उन्हाळ्यातील उकाड्यापासून अत्यावश्यक दिलासा मिळतो, पण ड्रायव्हर्सना अनेक आव्हानांचा देखील सामना करावा लागतो. मुसळधार पाऊस, पाणी साचलेले रस्ते आणि कमी दृश्यमानता यामुळे अपघात होण्यासह गाड्यांचे नुकसान होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.
अशा स्थितींचा सुरक्षितपणे सामना करण्यासाठी आणि तुमची गाडी दीर्घकाळापर्यंत उत्तम स्थितीत राहण्याची खात्री घेण्यासाठी उत्तमरित्या तयार असणे महत्त्वाचे आहे. सर्वसमावेशक मोटर विम्यासह सक्रियपणे वेईकल मेन्टेनन्स पावसाळ्यादरम्यान तुमच्या कारची सुरक्षितता राखण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते, ज्यामधून तुम्हाला मन:शांती मिळू शकते.
मोटर विमा ही पॉलिसी आहे, जी वाहतूकीमध्ये टक्कर, चोरी आणि तुमच्या वाहनाशी संबंधित इतर अनपेक्षित घटनांमुळे होणारे नुकसान किंवा शारीरिक दुखापतीसाठी आर्थिक संरक्षण देते.
मोटर विम्याच्या फायद्यांमध्ये अपघातामुळे होणाऱ्या दुरूस्ती खर्चांसाठी कव्हरेज, चोरी व तोडफोडीपासून संरक्षण, अपघातामुळे होणाऱ्या वैद्यकीय खर्चांसाठी आर्थिक साह्य आणि अतिरिक्त सेवा जसे टोईंग व रोडसाइड असिस्टण्स यांचा समावेश आहे. यामधून तुमचे आर्थिक नुकसानापासून संरक्षण होण्यासोबत आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक सेवा उपलब्ध होण्याची देखील खात्री मिळते.
मान्सूनदरम्यान मोटर विम्याचे महत्त्व
पावसाळ्यामध्ये अपघात, वेईकल ब्रेकडाऊन्स आणि वेईकलचे नुकसान होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. सर्वसमावेशक मोटर विमा पुढील संभाव्य समस्यांच्या व्यापक श्रेणीसाठी कव्हरेज देतो:
- अपघात आणि टक्कर: निसरडे रस्ते व कमी दृश्यमानतेमुळे अपघात होऊ शकतात. सर्वसमावेशक विमा दुरस्ती खर्च आणि थर्ड-पार्टी लायबिलिटीजसाठी कव्हरेज देतो.
- पूरामुळे होणारे नुकसान: मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊ शकते, पाण्यामुळे तुमच्या वाहनाचे इंजिन व इलेक्ट्रिकल घटकांचे नुकसान होऊ शकते. हा विमा दुरुस्ती किवा रिप्लेसमेंट खर्चांसाठी कव्हरेज देऊ शकतो.
- टोईंग आणि रोडसाइड असिस्टण्स: ब्रेकडाऊनसंदर्भात विमा पॉलिसी अनेकदा टोईंग सेवा व रोडसाइड असिस्टण्स देतात, ज्यामुळे तुम्ही प्रतिकूल हवामान स्थितींदरम्यान अडकून राहणार नाही याची खात्री मिळते.
- चोरी व तोडफोड: पावसाळ्यादरम्यान चोरी व तोडफोडीचा धोका वाढू शकतो. सर्वसमावेशक विमा या जोखीमांविरोधात संरक्षण देतो.
सर्वसमावेशक मोटर विमा घेण्यासोबत तुमच्या वेईकलला मान्सून सीझनसाठी सुसज्ज करणे महत्त्वाचे आहे, ज्यासाठी तुम्ही विविध पावले उचलू शकता, जसे ओल्या व निसरड्या रस्त्यांसाठी तुमच्या वेईकलच्या टायर्समध्ये पुरेसे ट्रेड आहेत आणि ब्रेक उत्तमरित्या कार्यरत आहेत याची खात्री घ्या; जीर्ण झालेले वायपर ब्लेड्स बदला, विंडशील्ड वॉशर फ्लूईड टँकमध्ये पाण्याची पातळी राखून ठेवा आणि उत्तम दृश्यमानतेसाठी सर्व लाइट्स योग्यरित्या कार्यरत आहेत याची तपासणी करा; ब्रेकडाऊन्स टाळण्यासाठी वेईकलची बॅटरी व इलेक्ट्रिकल घटक उत्तम स्थितीत असण्याची खात्री घ्या; आणि संभाव्य समस्यांना ओळखण्यासाठी नियमितपणे मेन्टेनन्स व सर्विसिंग करा, तसेच तुमची वेईकल उत्तम स्थितीत असण्याची खात्री घ्या.
पावसाळ्यादरम्यान ड्रायव्हिंग करताना पुढील सूचनांचे पालन करा – रस्त्यावर साचलेल्या पाण्यामध्ये गाडी चालवू नका, कारण साचलेल्या पाण्यामध्ये खड्डे किंवा मोठ्या खड्ड्यांचा अंदाज लावता येऊ शकत नाही, तसेच खड्डा मोठा असल्यास गाडीमध्ये पाणी शिरू शकते, वेगाने गाडी चालवताना कमी गिअर ठेवा, ज्यामुळे पाणी एक्झॉस्ट पाइपमध्ये जाणार नाही, उंच जागेवर ड्राइव्ह करा, तसेच पार्किंग करा. पार्किंग करताना खिडक्या पूर्णपणे बंद ठेवा, ज्यामुळे गाडीमध्ये पाणी शिरणार नाही.
गाडीमध्ये पाणी शिरले आणि गाडी थांबली असली तर हायड्रॉस्टॅटिक लॉक होणे टाळण्यासाठी गाडी सुरू करू नका, अन्यथा पाणी इंजिनमध्ये जाऊ शकते. गाडी पार्क केलेल्या परिसरात पूर आल्यास इंजिनचे नुकसान होणे टाळण्यासाठी गाडी सुरू करू नका.
अशा स्थितींमध्ये ब्रेक्स, एअर फिल्टर्स यांची तपासणी करण्यासाठी, तसेच इंजिन ऑईल, ब्रेक ऑईल, ट्रान्समिशन ऑईल इत्यादी रिप्लेस करण्यासाठी व्यावसायिक दुरूस्ती सेवांची आवश्यकता असते. तसेच, गाडीचा आतील भाग पूर्णपणे स्वच्छ केला पाहिजे, ज्यामुळे गाडी चालवण्यासाठी योग्य स्थितीत असण्याची खात्री मिळू शकते.
पावसाळ्याच्या आगमनासह सर्वसमावेशक मोटर विम्याच्या माध्यमातून वेईकलला सुरक्षित करणे महत्त्वाचे आहे. हा विमा आर्थिक संरक्षण देण्यासोबत मन:शांती देखील देतो, ज्यामुळे तुम्ही पावसाळ्यामध्ये आत्मविश्वासाने येणाऱ्या आव्हानांचा सामना करू शकता. तुमची मोटर विमा पॉलिसी अद्ययावत असण्याची आणि पावसाळ्याशी संबंधित सर्व संभाव्य जोखीमांसाठी कव्हरेज असण्याची खात्री घ्या.
मोटर विम्यावरील हा लेख एसबीआय जनरल इन्शुरन्सच्या वतीने एसबीआय जनरलच्या अंडररायटिंगचे प्रमुख श्री. एस. विश्वनाथन यांनी लिहिला आहे.