हिंदू जनजागृती समितीची राष्ट्रपतींकडे कारवाईची मागणी

By: Editor _2

On: Thursday, July 4, 2024 3:31 PM

Google News
Follow Us
राहुल गांधी यांच्या हिंदू धर्मियांविषयीच्या वक्तव्यावर हिंदू जनजागृती समितीची राष्ट्रपतींकडे कारवाईची मागणी !
     मंचर (जिल्हा पुणे) – हिंदू जनजागृती समितीने मंचर जिल्हा पुणे येथील प्रांत कार्यालयामार्फत राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना एक निवेदन देऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हिंदू समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे निवेदन देण्यासाठी जिल्ह्यातील हिंदु जनजागृती समितीचे श्री.निवृत्ती डोके, श्री.ओंकार दैने, श्री. दिलीप शेटे, हिंदुत्ववादी श्री. निलेश थोरात उपस्थित होते. नायब तहसीलदार श्री मुंडे यांना हे निवेदन देण्यात आले.
राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे हिंदू जनजागृती समितीने राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व तत्काळ रद्द करण्याची मागणी केली असून, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली आहे. राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने यापूर्वीही भगवा दहशतवाद किंवा हिंदू दहशतवादाची संकल्पना समाजात रुढ करून हिंदू समाजाची नाहक बदनामी केली होती.
हिंदू जनजागृती समितीने राष्ट्रपतींना सादर केलेल्या निवेदनात, राहुल गांधी यांनी हिंदू समाजाची सार्वजनिक आणि बिनशर्त माफी मागावी अशी मागणी केली आहे. समितीने असेही सांगितले आहे की, राहुल गांधी यांनी लोकसभेत घेतलेल्या समभावाने वागण्याच्या शपथेचा भंग केला आहे, त्यामुळे त्यांच्या निवडणुकीसाठी कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी.
For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

May 30, 2026

May 30, 2026

May 29, 2026

May 29, 2026

May 29, 2026

May 29, 2026