केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्सच्या ८७८ विद्यार्थ्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यात नोकरीची संधी

पुणे: येवलेवाडी येथील केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या ८७८ विद्यार्थ्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यात नोकरीची संधी मिळाली आहे. दोन विद्यार्थ्यांना वार्षिक ३६ लाखाचे, तर दहा  विद्यार्थ्यांना  १६ लाखांचे पॅकेज मिळाले आहे. ४७० हुन अधिक विद्यार्थ्यांना ४ ते ७ लाखांहून अधिकचे वार्षिक पॅकेज मिळाले. तांत्रिक, स्थापत्य, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये १०० टक्के प्लेसमेंटची परंपरा यंदाही कायम राखत ‘केजे’च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचालित ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनीरिंग, ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग आणि केजे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड रिसर्च या तीनही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्टेल प्रोटोकॉल, व्हर्चु इन्फ्रा, आयबीएम, अटॉस, पर्सिस्टन्ट, झोरिएंट, बेटसॉल, इकोटेक सिस्टिम, जेबीएम, एसआइएल, मेकर स्ट्राईव्ह, जेसिबी, फुचुरींग डिझाईन, इगल बर्गमन, मॅग्ना ऑटोमोटिव्ह, जेनेरल मॅनजमेण्ट सिस्टिम, स्पाइसर डाना, सेंडविक इंडिया, अल्ट्रा इंजिनीरिंग, बॉस चॅसीस लिमिडेट, प्लॅस्टिक ओमनीम, रोहन कॉन्स्ट्रकशन, विकंस्ट्रक्ट, टी अँड टी इन्फ्रा, जीसोअर्स, टीसीएस, एपी अससोसिएट अँड इनका, हेक्सावेअर, युएसटी ब्लूकाँच, पार्कर डिजिटल, कालिटी किऑस्क, एनटेंन्जले लॅब, केजीके इन्फोटेक, रॉकवेल ऑटोमेशन इत्यादी विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली आहे.
केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष कल्याण जाधव, कॅम्पस संचालक मेजर जनरल (नि.) समीर कल्ला, तांत्रिक संचालक डॉ. ए. एम. फुलांबरकर, प्राचार्य डॉ. निलेश उके, डॉ. सुहास खोत, डॉ. अभिजीत औटी, प्लेसमेन्ट ऑफिसर प्रा. किरण पवार, प्रा. राजूसिंग राठोड, प्रा. मोनिका समृतवार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शिक्षण संस्थेचे ग्रामीण भागातील होतकरू विदयार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना अंतिम वर्षात विशेष संवाद कौशल्ये आणि बुद्धिमत्ता विकासाचे मोफत प्रशिक्षण दिल्याचा फायदा झाला, असे समीर कल्ला यांनी नमूद केले. प्लेसमेंट  टीमने मागच्या तीन वर्ष्यात विविध मल्टिनॅशनल कंपनीसोबत करार करून सेंटर ऑफ एक्सलेन्स च्या माध्यमातून स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस मुलांसाठी उपलब्ध करून दिल्याने विशेष मदत झाली. त्यामध्ये सॅप, एडुनेट, नेटस्कॉउट, सिडॅक, झेन्सार, एसव्हीर, सेन्टम, रुबीकॉन, एसटकूएस कडून विविध सर्टिफिकेशन कोर्सेस केल्याने खूप मदत झाली
कल्याण जाधव म्हणाले, “तांत्रिक, स्थापत्य, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये सद्यस्थितीत अनेक संधी आहेत. विद्यार्थ्यांनी सॉफ्टवेअर व कोअर ज्ञानाची सांगड घालून एआय, मशीन लर्निंग, रोबोटिक्स, ऑटोमेशन, इंटरनेट ऑफ थिंग्ज, डिझाईनिंग, नेटवर्किंग, क्लाऊड, डिजिटल टट्वीन  अशा विषयांत ज्ञान प्राप्त केल्याने फायदा झाला. संस्थेतील उत्कृष्ट शैक्षणिक उपक्रम आणि गुणवत्ता वाढ, नॅकची ‘ए प्लस’ श्रेणी आदी गोष्टी विचारात घेऊन अनेक नामवंत कंपन्या संस्थेत अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि मुलाखती घेऊन निवड करतात.”