ह्युंदाई मोटर इंडियाकडून पुण्‍यामध्‍ये तीन नवीन डिलर शोरूम्‍सचे उद्घाटन

पुणे, जून, २०२४: ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल) ने आज ह्युंदाई मोटर कंपनीच्‍या ग्‍लोबल डिलरशीप स्‍पेस आयडेण्टिटी (जीडीएसआय) २.० मार्गदर्शक तत्त्वांशी बांधील राहत महाराष्‍ट्रातील पुणे येथे तीन नवीन डिलर शोरूम्‍सचे उद्घाटन केले. आधुनिकता, अनुभव, आरामदायीपणा व तंत्रज्ञान या आधारस्‍तंभांवर विकसित करण्‍यात आलेली जीडीएसआय २.० ब्रँड आयडेण्टिटी एचएमआयएल डिलर शोरूम्‍समध्‍ये ग्राहकांना डिजिटली प्रगत, उत्‍साहपूर्ण व आरामदायी वातावरण देण्‍यासाठी आंतरराष्‍ट्रीय मानकांची खात्री देते. नवीन शोरूम्‍सचा तंत्रज्ञानाचा फायदा घेण्‍याचा आणि ग्राहकांना कार खरेदी करण्‍याचा उत्‍साहवर्धक अनुभव देण्‍याचा मनसुबा आहे.

महाराष्‍ट्रातील पुणे येथील ह्युंदाई, मोदी ह्युंदाई आणि कोठारी ह्युंदाई यांनी जीडीएसआय २.० नियमांची अंमलबजावणी केली आहे आणि आज एचएमआयएलचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. उन्‍सू किम, एचएमआयएलचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री. तरूण गर्ग व एचएमआयएलचे सेल्‍स अँड मार्केटिंगचे कार्यकारी संचालक श्री. जे टी पार्क यांच्‍या हस्‍ते या डिलरशिप्‍सचे उद्घाटन करण्‍यात आले.

जीडीएसआय २.० संकल्‍पनेमध्‍ये विविध प्रमुख वैशिष्‍ट्यांचा समावेश आहे, ज्‍यांचा ग्राहक अनुभव अधिक उत्‍साहित करण्‍याचा मनसुबा आहे, ही वैशिष्‍ट्ये पुढीलप्रमाणे:

Ø  शोरूममध्‍ये प्रवेश करणाऱ्या ग्राहकांना अधिक उत्‍साहित करण्‍यासाठी अद्वितीय, विशिष्‍ट आणि आरामदायी वेलकम स्‍पेस

Ø  वैयक्तिकृत परस्‍परसंवादांसाठी खाजगी व मध्‍यभागी असलेली कन्‍सल्‍टेशन स्‍पेस ग्राहकांना त्‍यांच्‍या खरेदी निर्णयांसाठी गोपनीयता प्रदान करेल

Ø  थीम कार्सचा अनुभव घेण्‍यासाठी विशेष झोन ग्राहकांना वेईकल्‍स एक्‍स्‍प्‍लोअर करण्‍यासोबत संलग्‍न होण्याची सुविधा देईल, ज्‍यामधून ह्युंदाईच्‍या नवीन इनोव्‍हेशन्‍स व डिझाइन्‍सचा शोध घेण्‍यासाठी विशिष्‍ट आणि लक्षवेधक मार्ग मिळेल

Ø  अत्‍याधुनिक ३डी कन्फिग्‍युरेटरच्‍या माध्‍यमातून सानुकूल उत्‍पादन अनुभव ग्राहकांना त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या पसंतीनुसार अॅक्‍सेसरीज मिक्‍स-मॅच करण्‍यासाठी त्‍यांची आवडती ह्युंदाई वेईकल इलेक्‍ट्रॉनिकली वैयक्तिकृत करण्‍यास सक्षम करतील

या उद्घाटनाबाबत मत व्‍यक्‍त करत ह्युंदाई मोटर इंडिया लि. (एचएमआयएल) चे व्‍यवस्‍थापकीय संचालक (एमडीव मुख्‍य कार्यकारी अधिकारी (सीईओश्री. उन्‍सू किम म्‍हणाले, ”एचएमआयएलमध्‍ये आम्‍हाला ग्राहकांना डिलरशिप अनुभवाचे जागतिक मानक प्रदान करण्‍यास सक्षम असण्‍याचा अभिमान वाटतो. आमचा जागतिक दृष्टिकोन ‘प्रोग्रेस फॉर ह्युमॅनिटी’शी बांधील राहत ग्‍लोबल डिलरशिप स्‍पेस आयडेण्टिटी २.० तंत्रज्ञान व नाविन्‍यपूर्ण पद्धतींच्‍या एकीकरणासह ग्राहकांना बहुमूल्‍य अनुभव देण्‍याप्रती एचएमआयएलच्‍या कटिबद्धतेला सादर करते. आम्‍हाला विश्‍वास आहे की, या नवीन डिलरशिप्‍स ग्राहकांसोबत दीर्घकालीन संबंध निर्माण करतील आणि ऑटोमोटिव्‍ह रिटेल स्‍पेसमध्‍ये नवीन बेंचमार्क्‍स स्‍थापित करतील.”

आपले मत व्‍यक्‍त करत ह्युंदाई मोटर इंडिया लि. (एचएमआयएल) चे सीओओ श्री. तरूण गर्ग म्‍हणाले, ”आम्‍हाला आज पुण्‍यामध्‍ये जीडीएसआय २.० मार्गदर्शकतत्त्वांसह तीन नवीन डिलर शोरूम्‍सचे उद्घाटन करताना आनंद होत आहे. या नाविन्‍यपूर्ण शोरूम संकल्‍पनेमधून आम्‍हाला ग्राहकांच्‍या गरजांबाबत असलेली माहिती आणि त्‍यांच्‍या अपेक्षांची पूर्तता करण्‍याप्रती आमची समर्पितता दिसून येते. नवीन जीडीएसआय २.० शोरूम्‍स पारदर्शकता वाढवतील आणि डिजिटल स्‍पेसपासून प्रत्‍यक्ष शोरूम्‍सपर्यंत उत्‍साहवर्धक खरेदी अनुभवासह ग्राहकांना आनंदित करतील. आम्‍ही पुढे जात असताना आमचा अधिकाधिक ह्युंदाई शोरूम्‍सना जीडीएसआय २.० ब्रँड आयडेण्टिटीमध्‍ये अपग्रेड करण्‍याचा मनसुबा आहे. आम्‍हाला विश्‍वास आहे की, नवीन डिलरशिप्‍स आमचा ब्रँड आणि आमच्‍या उत्‍पादनांसोबत ग्राहकांचा सहभाग अधिक वाढवतील.”

ग्राहकांना अत्‍याधुनिक कार खरेदी अनुभव देण्‍याचा मनसुबा असलेले जीडीएसआय २.० शोरूम्‍स ग्राहकांच्‍याबदलत्‍या महत्त्वाकांक्षांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. हे आधुनिक शोरूम्‍स एैसपैस आहेत आणि ग्राहकांना उत्‍साहपूर्ण व आरामदायी वातावरणाचा अनुभव देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. सतत संशोधन करत, ग्राहकांचे अभिप्राय जाणून घेत आणि भावी ट्रेण्‍ड्सची अपेक्षा करत हे परिवर्तन करण्‍यात आले आहे.