पुणे, एप्रिल, २०२४: भारतामध्ये एरोस्पेस आणि डिफेन्स सोल्युशन्स बनवणारी एक आघाडीची खाजगी कंपनी टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडने पुण्यामध्ये २ मे आणि ३ मे २०२४ रोजी पिंपरीतील हॉटेल कॅरिअडमध्ये वॉक-इन इंटरव्ह्यूचे आयोजन केले आहे. टीएएसएलच्या हैद्राबाद आणि नागपूर फॅसिलिटीमधील जागांसाठी या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड आपल्या हैद्राबाद आणि पुणे फॅसिलिटीमध्ये एनसी प्रोग्रामरची भरती करू इच्छित असून, उमेदवारांनी कॅड/कॅममध्ये डिप्लोमा किंवा बीटेक केलेले असणे आणि त्यांच्याकडे ४ ते ८ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडला आपल्या हैद्राबाद फॅसिलिटीसाठी ऑपरेटर असेम्ब्ली आणि पेंटरच्या जागा भरावयाच्या आहेत. त्यासाठी त्यांना ३ ते ६ वर्षांचा अनुभव असलेले आयटीआय-फिटर आणि अप्रेन्टिस उमेदवार हवे आहेत.

टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना समान संधी देते. सर्वात नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अत्याधुनिक सेवासुविधा उत्पादने विकसित करण्यासाठी कर्मचाऱ्यांना आपल्या ज्ञान व अनुभवाचा वापर करता यावा यासाठी पूरक वातावरण पुरवण्यासाठी ही कंपनी वचनबद्ध आहे.
जागतिक पातळीवरील आघाडीच्या एरोस्पेस आणि डिफेन्स कंपन्यांसोबत भागीदारी करून टाटा ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड आंतरराष्ट्रीय पुरवठा शृंखलेतील एक अविभाज्य सहयोगी आहे. आघाडीच्या डिफेन्स ओईएम कंपन्यांसाठी ही कंपनी ग्लोबल सिंगल सोर्स प्रोव्हायडर आहे.