सूर्यदत्त नॅशनल स्कूलचे सीबीएसई दहावी व बारावी परीक्षेत घवघवीत यश

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा बावधन येथील सूर्यदत्त नॅशनल स्कुलने कायम राखली आहे. दहावी व बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी शाळेच्या स्थापनेपासून सातत्याने घवघवीत यश संपादन करत शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे.
दहावीमध्ये आर्जवी पाठक ९७.४० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम आली आहे. प्रज्ञोत राज सिंग (९५.४० टक्के) व साची गाडे (९२.६० टक्के) यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकवला आहे. शाळेचा सलग नवव्या वर्षी बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट निकाल लागला आहे. आर्जवी पाठक हिला गणितामध्ये, तर साची गाडे हिला सामाजिक शास्त्रामध्ये १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत.
बारावीमध्ये विज्ञान शाखेत हरगुन कौर मथेरू ९८.४० टक्के गुणांसह शाळेत प्रथम आली आहे. सलग पाचव्या वर्षी बोर्ड परीक्षेत शाळेचा उत्कृष्ट निकाल लागला. श्रीश कदम याने विज्ञान शाखेतून ९६.६० टक्के गुण मिळवले, तर ऋता काशीकर, गायत्री कुंवर, सारा हरारी या तिन्ही विद्यार्थिनींना ९५.८० टक्के गुण मिळाले. प्रत्येक विषयात सर्वाधिक ९९ ते १०० टक्के गुण विद्यार्थ्यांनी मिळविले आहेत. बोर्ड परीक्षेत १४० विद्यार्थ्यांपैकी ४२ विद्यार्थ्यांना एकूण ९० टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळाले आहेत. हरगुन कौर मथेरू आणि ऋता काशीकर या विद्यार्थिनींना इन्फॉर्मेटिक्स प्रॅक्टिसेस विषयात, तर आर्यन पुराणिक याला गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहायक उपाध्यक्षा स्नेहल नवलखा यांनी विद्यार्थी, पालकांचे, तसेच मुख्याध्यापक, प्राचार्य, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. निकालातील सातत्य आणि शिक्षक व विद्यार्थ्यांतील सदृढ नाते यामुळे सर्वोत्तम कामगिरी शक्य होत असल्याचे मत प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी ‘सूर्यदत्त’च्या वतीने खूप शुभेच्छा आणि त्यांना भविष्यात लागणारे मार्गदर्शन, सहकार्य सूर्यदत्त नेहमी करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.