पुणे,०५ मे २०२४: भारतातील आघाडीच्या नूतनीकरणीय ऊर्जा विकासक आणि संचालक कंपन्यांपैकी एक आणि कृषी मंत्रालयांतर्गत नोंदणी करण्यात आलेली, मल्टी-स्टेट सहकारी संस्था नॅकॉफचा पाठिंबा असलेल्या नॅकॉफ ऊर्जाने पर्यावरणपूरक शेतीला प्रोत्साहन देऊन शेती लाभदायक बनवण्यासाठी ई ऍस्ट्रा नॅकॉफ ऊर्जा प्रायव्हेट लिमिटेड हे स्पेशल पर्पज व्हेईकल सुरु केल्याची घोषणा केली आहे. हे एसपीव्ही नॅकॉफ ऊर्जाचे ऍग्रिकल्चरल मोबिलिटी विंग बनून बॅटरीवर चालणारी उपकरणे व वाहने प्रस्तुत करून भारतीय शेतकऱ्यांना सेवा प्रदान करेल.
नव्याने तयार करण्यात आलेले एसपीव्ही ई-वीडर, ई-रीपर, ई-ब्रश कटर आणि ई-कार्गो मल्टी-युटिलिटी तीनचाकी यासारखी शेतीची विशेष उपकरणे आणि वाहने तसेच नव्याने विकसित केलेले २० लिटर मिल्किंग व चिलर युनिट प्रस्तुत करेल. हे युनिट पर्यावरणपूरक डेअरी शेतीवर भर देईल. ई-ऍस्ट्राने एक स्वतंत्र ऍडवान्स्ड टेक्नॉलॉजी सेंटर देखील उभारले असून जिथे पेशंट-अप्लाइड व्हीसीयू विकसित करण्यात आले आहे, जे इलेक्ट्रिक वाहनांची सर्व फंक्शन्सवर नियंत्रण ठेवते आणि इलेक्ट्रिक व्हेईकल रेन्ज एक्सटेंडर टेक्नॉलॉजीवर आधारित आहे.
नॅकॉफ ऊर्जाचे चेयरमन श्री राम इक्बाल सिंग म्हणाले, “भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्याच्या प्रयत्नांमध्ये योगदान देण्याप्रती आमची बांधिलकी या नवीन उपक्रमामध्ये खूप महत्त्वाची आहे. शेतकरी आमचे अन्नदाता आहेत आणि त्यांना शुद्ध उर्जेवर चालणारी अत्याधुनिक, स्वदेशी व परवडण्याजोगी शेती उपकरणे उपलब्ध करवून दिल्याने त्यांची उत्पादनक्षमता वाढेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा ऍनालिसिस यांचा समावेश असलेल्या आमची डिजिटल शेती सुविधा शेतकऱ्यांना पिकांची स्थिती, हवामान, सिंचन याविषयी महत्त्वपूर्ण माहिती पुरवतील व त्यांचे प्रयत्न अगदी सहजपणे सुरळीत होतील.”
नॅकॉफ ऊर्जाचे व्यवस्थापकीय संचालक श्री सुरेश बाबू पी म्हणाले, “पर्यावरणपूरक शेती ही काळाची गरज आहे. आमच्या शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता आहे आणि त्यांच्या गरजा पूर्ण करू शकतील अशी सर्वोत्तम उपकरणे आणि मोबिलिटी उत्पादने उपलब्ध करवून देऊन आम्ही त्यांना त्यांची उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी सक्षम बनवू शकतो आणि शेती हा त्यांच्यासाठी लाभदायक उत्पन्न मिळवण्याचा मार्ग बनेल हे सुनिश्चित करू शकतो. भारतीय शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरवून सक्षम करावे, यांत्रिकीकरणामुळे त्यांची मेहनत हलकी व्हावी, शेतीतील सर्वात नवीन प्रथांच्या तोडीस तोड प्रथा त्यांना उपयोगात आणता याव्यात हे या एसपीव्हीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आम्हाला खात्री आहे की, हे उद्दिष्ट पूर्ण करण्याची क्षमता आमच्याकडे आहे.”