सोनालिका ट्रॅक्टर्सने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये १५.३ टक्के इतका एकूण वार्षिक बाजार हिस्सा नोंदवला

पुणे , ११ एप्रिल २०२४ : भारताचा क्रमांक एकचा ट्रॅक्टर निर्यात ब्रँड असलेल्या सोनालिका ट्रॅक्टर्सने एक नवीन दिमाखदार कामगिरी करून आर्थिक वर्ष २०२४ चा सर्वांगीण भरधाव प्रवास पूर्ण केला आहे. नाविन्यपूर्णता आणि शेतकरीकेंद्रीत दृष्टिकोन यांच्या प्रति कटिबद्धता पुढे नेत कंपनीने ही कामगिरी केली आहे. कंपनीला आर्थिक वर्ष २०२४ मध्ये १५.३ टक्के (अंदाजे) या सर्वकालीन सर्वोच्च वार्षिक एकंदर बाजारपेठ हिश्श्याची नोंद करताना आनंद होत आहे. तसेच देशांतर्गत बाजारपेठेत आर्थिक वर्ष  २०२४ मध्ये वाढ नोंदविणारा तो एकमेव ब्रँड ठरला आहे. या चमकदार कामगिरीमुळे सोनालिकाला उद्योगाची कामगिरी मागे टाकणेसुद्धा शक्य झाले आहे.

सोनालिकाच्या या नवीन विक्रमामध्ये आर्थिक वर्ष २०२४ मधील ३४.४ टक्के (अंदाजे) एवढ्या निर्यात बाजारपेठ हिश्श्याचासुद्धा समावेश आहे. भारतातील ट्रॅक्टर निर्यात कंपन्यांमध्ये सोनालिकाने ही कामगिरी नोंदविली आहे. यात बाजारपेठेतील हिश्श्यामधील भरीव अशा ६.२ टक्के अंश (अंदाजे) बदलाचाही   समावेश आहे. यामुळे भारताचा क्रमांक एकचा ट्रॅक्टर निर्यातक म्हणून कंपनीचे स्थान भक्कम झाले असून त्याच्या पुढील ब्रँडपेक्षा ती लक्षणीय प्रमाणात पुढे आहे. या संपूर्ण वर्षभरात सोनालिका आर्थिक वर्ष २०२४ च्या परिस्थितीच्या गरजांमधून मार्ग काढत राहिली आणि चाकोरीबाहेरचा आपला दृष्टिकोन जोपासत राहिली.  

* होशियारपूर येथे १३०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून दोन नवीन प्रकल्पांचे अनावरण करून ज्यामुळे जगातील सर्वात मोठ्या ट्रॅक्टर प्रकल्पाची मालकी असल्याची सोनालिकाची स्थिती आणखी दृढ होईल.
* भारतात ‘आयटीएल ग्लोबल पार्टनर्स समिट(जीपीएस २००)’ या अशा प्रकारच्या पहिल्याच कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसाठी तयार केलेल्या ५ नवीन ट्रॅक्टरचे अनावरण करून, ज्यामध्ये एसव्ही मालिकेच्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा समावेश आहे.
* प्रीमियम टायगर मालिकेत ४०-७५ एचपी श्रेणीत सर्वोत मोठ्या १० नवीन मॉडेलचे अनावरण करून.
* आपल्या श्रेणीतील सर्वात मोठे इंजिन असलेले सिकंदर डीएलएक्स डीआय ६० टॉर्क प्लस सादर करून आणि उद्योगातील प्रथमच देशभरात एकच किंमत लागू करून.
*आपल्या सर्व ट्रॅक्टर श्रेणींमध्ये 5 वर्षांची ट्रॅक्टर वॉरंटी सादर करून

सर्वसमावेशक कृषी उपाय उपलब्ध करून संपूर्णपणे यांत्रिक कृषी इकोसिस्टम प्रस्थापित करण्याच्या दिशेने सोनालिकाची वाटचाल सुरू होत आहे. अशा वेळेस  संपूर्ण आर्थिक वर्ष २०२४ मधील सोनालिकाच्या प्रवासातून हेवी-ड्यूटी ट्रॅक्टर आणि प्रगत अवजारे यांच्या सहाय्याने तळागाळातील शेतकऱ्यांशी कंपनीचा समन्वय दिसून येतो.

इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक श्री. रमण मित्तल म्हणाले, “आमच्या प्रीमियम टायगर रेंज आणि फ्लॅगशिप सिकंदर डीएलएक्स सीरीजमध्ये नवीन आणि प्रगत उत्पादने लाँच करण्यावर आमचा सातत्यपूर्ण फोकस आहे. त्यासोबतच आमच्या संपूर्ण हेवी ड्यूटी ट्रॅक्टर श्रेणीच्या तंत्रज्ञानामध्ये सातत्याने सुधारणा केल्यामुळे ही आश्चर्यकारक वाढ झाली आहे. याशिवाय, आमच्या वेबसाईटवर ट्रॅक्टरच्या किमती दाखविण्याच्या आमच्या अनोख्या पावलामुळे ट्रॅक्टर खरेदीमध्ये पारदर्शकता निर्माण झाली आहे. त्यातून भागधारकांचा आमच्या ब्रँडवरील विश्वास सतत वाढत गेला आहे. या विशिष्ट दृष्टीकोनामुळे आमचा सतत वाढीचा मार्गही मोकळा होत आहे. शिवाय, भारतातून ट्रॅक्टर निर्यातीत आमच्या अग्रस्थानामुळे आम्ही जगभरात सतत आणि आक्रमकपणे नवनवीन शोध घेण्यासाठी प्रवृत्त होत आहोत. यातील बहुतांश तंत्रज्ञानाच्या नवकल्पना ‘मेड इन इंडिया’ असल्याने, त्या आम्हाला चांगल्या भविष्यासाठी तयार होण्यात मदत करत आहेत. आमचे शिर उंच करून आणि अशा उल्लेखनीय कामगिरीच्या मागोमाग आम्ही एक संस्था आणि नेटवर्क म्हणून आणखी मजबूत झालो आहोत. त्यातून आर्थिक वर्ष  २०२५ मध्ये नवीन टप्पे गाठण्यासाठी  आणि आमच्या ‘मिशन २ लाख’कडे वेगाने वाटचाल करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.”