केएसबी पंप ने कृषी आणि घरगुती पंपांची नवीन श्रेणी केली लॉन्च

पुणे१६ एप्रिल २०२४ : केएसबी पंपांचे अधिकृत वितरक महावीर एंटरप्रायझेस (सचिन चंगेडिया) यांनी हॉटेल प्राईड मध्ये असोसिएट डीलर्स कॉन्फरन्सचे आयोजन केले होते. या परिषदेचा मुख्य उद्देश कंपनी आणि त्यांच्या कृषी व घरगुती पंपांविषयी सविस्तर माहिती देणे हा होता.

केएसबी पंप कंपनीच्या वेस्ट जोनचे जनरल मैनेजर ई. किशोर म्हणाले कीआज आम्ही जगभरातील १५० हून अधिक देशांमध्ये व्यवसाय करत आहोतपण आमचा उद्देश चॅनल पाटनर्स द्वारे  आमच्या प्रत्येक ग्राहकाच्या गरजा समजून घेणे आणि त्यांच्या समस्या सोडवणे हा आहे. केएसबीची सुरुवात १८७१ मध्ये जर्मनीमध्ये झाली आणि कंपनीला १५० हून अधिक वर्षे यशस्वी झाली आहेत. आमच्या ग्राहकांच्या नवीन गरजा पूर्ण करण्यासाठीआमचा रिसर्च सेंटर आणि विकास विभाग दररोज नवीन शोध लावण्यासाठी नेहमीच तयार असतो.

ते पुढे म्हणाले की देशांतर्गत पंपांच्या मालिकेत२ एचपी सिंगल फेस ओपन वेल सबमर्सिबल आणि १ एचपी , १.५ एचपी आणि २ एचपी थ्री फेस ओपन वेल सबमर्सिबल तसेच १ एचपी १.५ एचपी आणि २ एचपी ३ फेस सेंट्रीफ्यूगल मोनोब्लॉकचा लाँच केला आहे त्याचा वापर केला कारंजेबागकामात सिंचन आणि घरांमध्ये पाण्याची व्यवस्था करण्यासाठी केला जातो.

परिषदेत कंपनीच्या उत्पादनांची माहिती उपव्यवस्थापक श्रीकांत माडेकर यांनी दिली तसेच १० डीलर्सना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रोत्साहन देण्यात आले व त्यांचा कंपनीच्या उच्च व्यवस्थापनाच्या वतीने गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमादरम्यान कंपनीने कृषी आणि घरगुती पंपांची नवीन श्रेणी देखील लॉन्च केली. या समारंभात केएसबी पंप कंपनीचे रीजनल मैनेजर अभिषेक त्रिपाठीएरिया सेल्स इंजीनियर ओंकार कुलकर्णीमहावीर एंटरप्रायझेसचे सचिन चंगेडिया आणि ललित लुनिया जी उपस्थित होते.