एचडीएफसी अर्गो तर्फे ‘पॉन्स एन क्लॉज’ या सर्वसमावेशक विमा योजनेची सुरुवात- पाळीव प्राण्यांच्या निदाना पासून प्रक्रिया आणि औषधांसाठी सर्वसमावेशक योजना

एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स या भारतातील आघाडीच्या खाजगी क्षेत्रातील सर्वसाधारण विमा कंपनी तर्फे आज पॉज एन क्लॉज या सर्वसमावेशक अशा पाळीव कुत्रे आणि मांजरींसाठीच्या विशेष प्लॅनची घोषणा केली.

भारतातील पाळीव प्राण्यांची बाजारपेठ ही अतिशय स्थीर गतीने म्हणजेच वर्षाला १३ टक्क्यांनी वाढत असून ही बाजारपेठ २०२५ पर्यंत ८०० बिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.  जरी ही सातत्यपूर्ण वाढ होत असली तरीही पाळीव प्राण्यांच्या देखभालीचे एक आव्हान अनेक पाळीव प्राण्यांच्या मालकांसमोर असते आणि ते त्यांच्या उपचारांवर हजारो रुपये खर्च करत असतात.

ही दरी लक्षात घेऊन एचडीएफसी अर्गोच्या पॉन्स एन क्लॉज योजने मध्ये एन्डटूएन्ड पेट केअर म्हणजेच निदान प्रक्रियेपासून ते औषधांपर्यंतच्या सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.  योजनेची प्रमुख विशेषता म्हणजे ‘मेक युअर प्लॅन’  पर्याया अंतर्गत ग्राहक आता त्यांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन योजना तयार करु शकतील जसे जखमा, आजार आणि सर्जरी इत्यादींचा पर्याय निवडू शकतील.  या योजने मध्ये थर्ड पार्टी धोके हे १ कोटी रुपयांपर्यत असून पाळीव प्राण्यामुळे जर मोठी जखम झाली किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास विविध पर्यायांसह पशूवैद्यकीय तज्ञां बरोबर ऑडिओ आणि व्हिडिओ कन्सल्टेशन, अंतिम संस्कारांचा खर्च इत्यादींचा ही यांत समावेश आहे.

पाळीव प्राण्याच्या आजार, जखमा आणि सर्जरीज च्या आर्थिक ताणापासून पालकांना मुक्ती देण्यासाठी तयार करण्यात आलेली ही योजना असून या योजनेमध्ये एकाच वेळी एकाच पॉलिसीत ५ पाळीव प्राणी तर व्यावसायिक ब्रीडर्स साठी १० पाळीव प्राण्यांचा समावेश करता येतो, या प्राण्यांचे वय हे सहा  महिन्यांपासून ते पाच वर्षांपर्यंतचे असून ही योजना ८ वर्षांपर्यंत वाढवता येते.  या योजनेमध्ये ओपीडी कव्हर आणि क्षेत्रातील पहिल्या ट्रीप कॅन्सलेशन वैशिष्ट्याचा समावेश आहे.  यामध्ये जर त्यांच्या पाळीव प्राण्याच्या आजारपणामुळे त्यांची ट्रिप रद्द झाली तर वित्तीय सहकार्य केले जाते.  हे उत्पादन इझी डिजिटल ऑन बोर्डिंग सह केवळ प्राण्याचा फोटो अपलोड करुन सुरु करता येते.

या उत्पादनाच्या सुरुवाती विषयी बोलतांना एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स च्या रिटेल बिझनेस चे प्रेसिडेंट पार्थनील घोष यांनी सांगितले “ ग्राहकांच्या अनुभवावर आधारीत एक संस्था म्हणून एचडीएफसी अर्गो मध्ये आम्ही सातत्याने ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करणारी उत्पादने देऊन त्यांना जीवनाच्या प्रत्येक घटकात चिंतामुक्त करत असतो. एकीकडे पाळीव प्राणी हे संपूर्ण घराचे लाडके असतांनाच दुसरीकडे त्यांच्या खेळकर साहसा मुळे कधीकधी अचानक वैद्यकीय खर्च उद्भवतो. संपूर्ण भारतात प्राणी पाळणार्‍यांची संख्या वाढत असतांना पॉज एन क्लॉज मुळे पाळीव प्राण्यांच्या पालकांना मनाची शांती देते, यामुळे ते त्यांच्या सर्वसमावेशक आरोग्यावर लक्ष देऊ शकतात.  आम्ही नुकताच पाळीव प्राण्यांसाठी आमच्या हिअर ॲपवर सुरु केला असून हे ॲप म्हणजे अनोखी अशी विमा इकोसिस्टम आहे जी प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्य आणि मोटरच्या गरजा पूर्ण करते, आता हीच इकोसिस्टम पाळीव प्राण्यांच्या पालकांना मदत होऊन ते आता सोप्या पध्दतीने व्यवस्थापन करुन त्यांच्या प्राण्याच्या विविध गरजा पूर्ण करु शकतील, इतकेच नव्हे तर आता ते पशूवैद्यां बरोबरच अन्य प्राण्यांच्या पालकां बरोबरही संवाद साधू शकतील.”

कंपनी तर्फे ११ एप्रिलच्या पूर्वसंध्येला हे उत्पादन सुरु केले असून हा दिवस नॅशनल पेट्स डे म्हणून साजरा केला जातो, म्हणूनच आता पाळीव प्राण्यांचे पालक आता त्यांच्या आवडीच्या प्राण्याला होणारी इजा, आजारपण आणि सर्जरीच्या अकस्मात येणार्‍या खर्चापासून बचाव करु शकतील.