गोदरेज अँड बॉयसतर्फे व्यावसायिक स्तरावरील जगातील सर्वात मोठ्या ग्रीन हायड्रोजन उत्पादन केंद्रापैकी एका केंद्रासाठी योगदान

मुंबई१५ एप्रिल २०२४ – गोदरेज अँड बॉयस या गोदरेज समूहाच्या प्रमुख कंपनीने जाहीर केले आहेकी त्यांच्या गोदरेज प्रोसेस इक्विपमेंट व्यवसायाने मध्यपूर्वेतील ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी हीट एक्सचेंजर्स पाठवून महत्त्वाचे योगदान दिले आहे. हा प्रकल्प जगभरातील सर्वात मोठ्या व्यावसायिक व्याप्तीच्या हायड्रोजन उत्पादन केंद्रांपैकी एक आहे. हा व्यवसाय २०२७ पर्यंत मध्यपूर्व बाजारपेठेतील हिस्सा दुप्पट करण्याच्या मार्गावर आहे. कंपनीने पाठवलेल्या हीट एक्सचेंजर्समुळे उत्पादन प्रक्रियेतील विविध टप्प्यांवर उष्णता हस्तांतरणाचे काम करतील व पर्यायाने शाश्वत उर्जा यंत्रणेचा अवलंब करण्यासाठी हातभार लागेल. ही उपकरणे प्लँटच्या गरजा पूर्ण करण्याच्या हेतूने तयार करण्यात आली असून दर्जेदार कामगिरी व विश्वासार्हता ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. पुरवण्यात आलेल्या ०८ हीट एक्सचेंजर्सपैकी सर्वात अवजड दोन उत्पादनांचे वजन ३०० मेट्रिक टन्सपैक्षा जास्त असून ते मोठ्या प्रमाणावर फ्लुईड हाताळू शकतील.

गोदरेज प्रोसेस इक्विपमेंटचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख हुसैन शारीयार म्हणाले, संपूर्ण जग शाश्वत उर्जेकडे वळत असल्यामुळे रिन्युएबल्समध्ये विशेषतः ग्रीन हायड्रोजनमध्ये लक्षणीय विकास झाला आहे. यासारखे भव्य प्रकल्प बदल घडवून आणू शकतील तसेच कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी व हरित उर्जेचा अवलंब करण्यात नाविन्य आणण्यासाठी योगदान देऊ शकतील. ग्रीन आणि ब्लू हायड्रोजन प्रकल्पांसाठी योगदान देण्याच्या आमच्या तयारीमुळे शाश्वत उर्जा निर्मिती क्षेत्रात आधुनिक पद्धती विकसित करण्याच्या या उद्योगाला चालना मिळाली आहे. अशाप्रकारच्या आणखी भारतीय आणि जागतिक हायड्रोजनग्रीन अमोनिया व ग्रीन मेथनॉल प्रकल्पांमध्ये सहभागी होऊन हरित उर्जा क्रांती पुढे नेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

व्यवसायाने दहेजगुजरात येथील जागतिक दर्जाच्या उत्पादन केंद्राच्या विकासासाठी ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्याद्वारे हायड्रोजनहरित उर्जा  व वीज क्षेत्रासाठी खास आणि मोठ्या उपकरणांचे वितरण शक्य होईल.