पुणे : भारती अभिमत विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी) तर्फे ‘सी – गुगली २०२४ इंटर कॉलेजिएट टेक्निकल कॉम्पिटिशन’ चे आयोजन करण्यात आले आहे. दि.५ एप्रिल रोजी ही स्पर्धा होईल. पूर्णपणे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित या स्पर्धेची नाव नोंदणी देखील क्यू आर कोड द्वारे होत आहे.
भारती विद्यापीठ आयएमईडीचे प्रभारी संचालक डॉ. अजित मोरे , उपप्राचार्य रामचंद्र महाडिक यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. या स्पर्धांमध्ये निंजा कोडींग, ब्रेक द क्वेरी, क्विझर्ड्स ऑफ ओझेड, डिबगिंग ड्युएल अशा तांत्रिक प्रकारांचा समावेश आहे. देशभरातून विविध महाविद्यालयातून विद्यार्थी सहभागी होणार आहेत. डॉ. सत्यवान हेंबाडे, प्रा. दीप्ती देशमुख, डॉ.हेमचंद्र पाडळीकर, डॉ. स्वाती देसाई डॉ. श्वेता जोगळेकर, डॉ. सुजाता मुळीक, संगीता पाटील, प्रतिमा गुंड हे संयोजन करीत आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, सन्मानचिन्हे दिली जाणार आहेत.