पश्चिम बंगालमध्ये ED नंतर NIA च्या टीमवर हल्ला झाला आहे. स्फोट, दहशतवादी हल्ले यांचा तपास करणारी NIA म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणा प्रमुख आहे. पण याच एनआयएच्या टीमवर हल्ल्याची घटना घडली आहे. काही महिन्यांपूर्वी ED च्या पथकावर अशाच प्रकारचा हल्ला झाला होता.
पश्चिम बंगालमध्ये ED नंतर NIA च्या टीमवर हल्ला झाला आहे. पूर्व मेदिनीपुरच्या भूपतिनगर भागात ही घटना घडली. जमावाने NIA च्या टीमवर विटा आणि दगडांनी हल्ला केला. अधिकाऱ्यांच्या गाड्यांमध्ये तोडफोड केली. या घटनेमध्ये एक अधिकारी जखमी झाला. NIA ची टीम शुक्रवारी रात्री पूर्व मेदिनीपुरच्या भूपतिनगर भागात झालेल्या स्फोटाचा तपास करण्यासाठी गेली होती.
टीमने काही आरोपींचा शोध घेण्यास सरुवात केली, तेव्हा प्रदर्शन करणाऱ्या काहीजणांनी एनआयएच्या टीमला घेरलं. एनआयए अधिकारी आणि सेंट्रल फोर्सवर विट आणि दगड फेकण्यात आले. ही घटना सकाळी 5.30 ची आहे. डिसेंबर 2022 मध्ये भूपतीनगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत नारीबिला गावात एका टीएमसी नेत्याच्या घरी स्फोट झाला होता. या स्फोटात तीन लोकांचा मृत्यू झालेला.
असं होण्याची ही काही पहिली वेळ नाहीय
पश्चिम बंगालमध्ये तपास यंत्रणेवर हल्ला होण्याची ही काही पहिली वेळ नाहीय. या वर्षाच्या सुरुवातीला संदेशखालीमध्ये ईडीच्या टीमवर हल्ला झाला होता. 100 पेक्षा जास्त लोकांनी ED च्या टीमला घेरलं व त्यांच्यावर हल्ला केला. गाड्यांवर दगड फेकण्यात आले. रेशन घोटाळा प्रकरणात ED ची टीम शाहजहां शेखच्या अटकेसाठी पोहोचली होती, त्यावेळी हा हल्ला झालेला. त्यानंतर जवळपास 55 दिवसांनी शाहजहांला अटक झाली.