भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम

By: Editor_Manas

On: Monday, April 15, 2024 5:10 PM

Google News
Follow Us
पुणे :भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘ राम कथा ‘ या नृत्य कार्यक्रमाचे दि.२० एप्रिल २०२४ रोजी आयोजन   करण्यात आले आहे.शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था यांच्यातर्फे हा कार्यक्रम प्रस्तुत केला जाणार आहे. श्रीमती उषा आर.के. यांच्या संकल्पनेतील या कार्यक्रमात ज्येष्ठ भरतनाट्यम कलाकार सत्यनारायण राजू यांचे नृत्य सादरीकरण या कार्यक्रमात करण्यात येणार  आहे.संगीत संयोजन डी.एस. श्रीवास्तव यांचे आहे.
हा कार्यक्रम शनिवार, २० एप्रिल   २०२४ रोजी सायंकाळी ६  वाजता  भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे  होणार आहे.हा कार्यक्रम विनामूल्य आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २०३ वा कार्यक्रम  आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.
For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

April 21, 2026

Malabar मलबार

April 20, 2026

April 18, 2026

April 17, 2026

April 16, 2026

April 16, 2026