नीता अंबानींच्या ताफ्यात अजून एका आलिशान गाडीचा समावेश; ज्यावर लिहलंय सोन्याने…

भारतातीलच नाही तर जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अंबानी कुटुंबियांचा समावेश आहे. त्यांचे आलिशान सोहळे, लक्जरियअस लाईफस्टाईल, दागिने अशा कारणांची वांरवार चर्चा होत असते. त्यातच अंबानी यांच्या कार कलेक्शनचीही विशेष चर्चा आहे. नुकतच मुकेश अंबानी  यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी नुकतच त्यांच्या ताफ्यात अजून एका आलिशान गाडीचा समावेश झालाय.

रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा व संस्थापक नीता अंबानी यांना महागड्या वस्तूंची हौस आहे, हे सर्वांना माहिती आहे. त्यांच्या साड्या, दागिने, पर्स, कपडे या सगळ्या गोष्टी कायमच चर्चेचा विषय असतात. त्यातच त्यांच्या या गाडीची एका विशेष वस्तूमुळे खास चर्चा आहे. त्यांच्या नव्या गाडीच्या बोनेटवर एक सोन्याची वस्तू बसवण्यात आलीये.

नीता अंबानी यांची नवी आलिशान गाडी  VIII (Rolls Royce Phantom VIII) खरेदी केली आहे. या गाडीच्या रंगामुळे, तसेच त्याच्या इंटिरियरमुळे साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहे. या गाडीचं इंटिरिअर डिझाईन हे लक्झरी लिमोसिन आणि ऑर्किड वेलवेटने तयार केलं आहे. त्याचप्रमाणे या गाडीच्या हेडसेटवर नीता अंबानींच्या नावाचे इनशीअल आहे. त्यामध्ये NMP म्हणजे नीता मुकेश अंबानी हे नाव इंग्रजीत लिहिण्यात आलंय. इतकच नाही तर स्पिरिट ऑफ एक्स्टसी हे देखील या गाडीवर आहे, जे सोन्याचं बनवण्यात आलं आहे.

नीता अंबानींच्या नव्या गाडीची देखील किंमत ही कोट्यावधी रुपयांची आहे. या गाडीची किंमत 12 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. नीता अंबानी यांचं कार कलेक्शन हे देखील तितकच लक्जरियस आहे. मागील वर्षी दिवाळीच्या जवळपास मुकेश अंबानींनी काळ्या रंगाची रोल्स-रॉयस कलिनन ही गाडी त्यांच्या बायकोला गिफ्ट केली होती. अंबानी यांच्या कार कलेक्शनमध्ये फेरारी पुरोसांग्यू, बुलेटप्रूफ मर्सिडीज-बेंज S-क्लास, रेंज रोवर LWB अशा अनेक आलिशान गाड्या आहेत.