आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्सचे नवीन ‘एबीएचएफएल – फिनवर्स’ गृहकर्जाच्या अनुभवाची नवी व्याख्या रचणार

मुंबई, २२ मार्च २०२४: भारतातील आघाडीची, वैविध्यपूर्ण आर्थिक सेवा प्रदान करणारी कंपनी आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी, आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने (एबीएचएफएल) ‘एबीएचएफएल – फिनवर्स’ हा एकीकृत डिजिटल लेन्डिंग प्लॅटफॉर्म सुरु केल्याची घोषणा केली आहे. ग्राहकांच्या गृहकर्ज अनुभवाची नवी व्याख्या रचण्याच्या उद्देशाने कंपनीने हे अभिनव पाऊल उचलले आहे. ‘एबीएचएफएल – फिनवर्स’ हा प्लॅटफॉर्म संपूर्ण कर्जप्रक्रियेचे डिजिटायझेशन करेल. प्रॉस्पेक्टिंगपासून कर्जाची रक्कम ग्राहकाला दिली जाण्यापर्यंत संपूर्ण प्रक्रियेचा यामध्ये समावेश करण्यात येईल. त्यामुळे ग्राहकांना अतिशय सहजसोप्या, सुरळीत कर्जप्रक्रियेचा अनुभव घेता येईल, कर्जासाठीच्या अर्जांवर अधिक वेगाने कार्यवाही केली जाईल, कर्ज प्रक्रिया कुठवर आली आहे याबाबतची पारदर्शकता वाढेल तसेच त्याची अद्ययावत, वास्तविक माहिती मिळत राहील.

घर खरेदी करताना येणाऱ्या अडीअडचणी, गृहकर्ज प्रक्रियेतील आव्हाने यांची नीट माहिती करून घेण्यासाठी एबीएचएफएलने ग्राहक व आपले सहयोगी यांच्यासह सखोल संशोधन केले. गृहकर्ज प्रक्रिया सोपी व सुरळीत करण्यासाठी तसेच या संपूर्ण प्रक्रियेवर ग्राहकांचे नियंत्रण राहावे यासाठी एबीएचएफएलने हा प्लॅटफॉर्म उभारण्याचे ठरवले.

अखंडित डिजिटल इंटरफेससह ‘एबीएचएफएल-फिनसर्व’ एक परिपूर्ण डिजिटल इकोसिस्टिम आहे, जी ग्राहक, सहयोगी, कर्मचारी आणि व्हेंडर्स यांना एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्र जोडते. ग्राहकांना समाधान व सुविधा मिळवून देण्यासाठी एबीएचएफएल बांधील असल्याचे हा प्लॅटफॉर्म दर्शवतो.

आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे एमडी आणि सीईओ श्री पंकज गाडगीळ यांनी सांगितले, “एबीएचएफएलमध्ये आम्ही आमची सर्व उत्पादने व सेवा ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून तयार करतो. एबीएचएफएलमार्फत होम लोन ट्रॅकिंगसारखे लाभ उपलब्ध करवून देऊन आम्ही ग्राहकांना सक्षम करत आहोत, यामध्ये रिअल-टाइम अपडेट्स, अखंडित नेव्हिगेशन आणि संपूर्णतः कागदरहित अनुभव मिळतो. प्रतिसादासाठी लागणारा वेळ लक्षणीय प्रमाणात कमी करून, गृहकर्ज अनुभव अधिक सोपे, वेगवान आणि जास्तीत जास्त ग्राहकांना मिळवता येतील असे करून ग्राहकांच्या गृहकर्ज अनुभवात परिवर्तन घडवून आणणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”

‘एबीएचएफएल – फिनवर्स’ टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या सहयोगाने सह-निर्मित करण्यात आलेले आहे. तंत्रज्ञान उपाययोजना तयार करण्यातील अनुभव तसेच आर्थिक सेवांबाबतची सखोल समज यांची सांगड घालून हा प्रचंड मोठा व कार्यक्षम प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. 

गृहकर्जाशी निगडित सर्व सेवासुविधा पुरवणारी आघाडीची कंपनी म्हणून, आपल्या ग्राहकांना नाविन्यपूर्ण आणि वापरायला सहजसोप्या उपाययोजना पुरवण्याच्या आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या बांधिलकीमध्ये ‘एबीएचएफएल – फिनवर्स’ ची सुरुवात हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. ‘एबीएचएफएल – फिनवर्स’ गूगल प्ले स्टोरवर उपलब्ध असून लवकरच ऍपल ऍप स्टोरवर देखील उपलब्ध करवून दिले जाईल.

‘एबीएचएफएल – फिनवर्स’ – वैशिष्ट्ये आणि लाभ

–          १२० पेक्षा जास्त एपीआय इंटिग्रेशन्ससह डेटा-चलित अल्गोरिदम्सचे एकीकरण

–          डिजिटल फॉर्म्स आणि फाईल्स मोड्यूल्समुळे कागदरहित लॉग-इन सुविधा

–          रिअल-टाइम अपडेट्स मिळत राहतात, त्यामुळे संपूर्ण गृहकर्ज प्रक्रियेची पारदर्शकता वाढते.

–          कर्ज वाटपासाठीचा टर्न-अराउंड वेळ लक्षणीय प्रमाणात कमी होतो.

–          अधिक जास्त कार्यक्षमतेसाठी लोकेशनवर आधारित बिझनेस ट्रॅकिंग

–          शून्य डाउनटाईममुळे अखंडित सेवा मिळते.

–          इंडिया स्टॅक, डीपीआयचे लाभ