पुणे : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने १८ तास अभ्यास अभियानाचे उदघाटन कामगार नेते नितीन पवार ,दलित चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत साळवे ,संविधान ग्रुपचे अध्यक्ष सचिन गजरमल,राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक राकेश सोनवणे व रिपब्लिकन विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश गायकवाड यांच्या उपस्थितीत डॉ.आंबेडकर सांस्कृतिक भवन (मालधक्का चौक) येथे झाले.रिपब्लिकन विद्यार्थी परिषद,संविधान ग्रुप, तक्षशिला बुद्ध विहार व इतर सर्व सामाजिक संघटना या अभियानात सहभागी झाल्या आहेत.उदघाटन प्रसंगी डॉ. संग्राम साळवे, दत्ताजी जाधव, शैलेश दुर्वणकर,सागर सपकाळ ,वंजारे सर, मिलिंद नगरे आदी उपस्थित होते.
दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी १८ तास अभ्यास करून अभिवादन करण्यात येते. शनिवार दिनांक १३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ठीक सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व बुद्ध विहार,शाळा- महाविद्यालय, विद्यापीठ, विविध शैक्षणिक संस्था,विविध सामाजिक संस्था, यामध्ये सहभाग नोंदवणार आहेत. ‘महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने देखील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे ,असे परिपत्रक काढले आहे. त्यातही मोठ्या संख्येने १८ तास अभ्यास करून सहभाग नोंदवावा’,असे आवाहन रिपब्लिकन विद्यार्थी परीक्षेच्या वतीने करण्यात आले आहे.