ओरिएंट इलेक्ट्रिकतर्फे सीएसआर उपक्रम उज्ज्वलची सुरुवात 

पुणे २७ मार्च २०२४: वैविध्यपूर्ण २.९ अब्ज डॉलर्सच्या सीके बिर्ला समूहाचा भाग असलेल्या ओरिएंट इलेक्ट्रिक लिमिटेडने, डीईई फाउंडेशनच्या सहकार्याने व्यवसाईक सामाजिक जबाबदारी बांधिलकीचा एक भाग म्हणून इलेक्ट्रिशियनच्या सर्वसमावेशक कौशल्यवृद्धीचा कार्यक्रम ‘उज्ज्वल’ नुकताच सुरू केला आहे. आर्थिक वर्ष २४ दरम्यान देशभरातील ५००० इलेक्ट्रिशियनचे कौशल्य वाढविण्याच्या उद्देशाने एनएसडीसी प्रमाणित कार्यक्रम, समुदायांना सशक्त करण्यासाठी आणि उद्योगातील कौशल्याची तफावत कमी करण्यासाठी कंपनीचे समर्पण अधोरेखित करतो.
ओरिएंट इलेक्ट्रिक लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, दीपक खेत्रपाल म्हणाले की, आमचा विश्वास आहे की, “इलेक्ट्रिशियन हे रोजच्या नायकांसारखे असतात आणि ते, घरे, व्यवसाय आणि उद्योगांचे अखंड कामकाज सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. म्हणूनच, आपण एक उद्योग म्हणून, कौशल्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून त्यांना उन्नत आणि सक्षम बनविणे सुरू ठेवणे आवश्यक आहे. आमचा सीएसआर  पुढाकार ‘उज्ज्वल’ हा त्याच दिशेने एक पाऊल आहे, ज्यामुळे समुदायांच्या सक्षमीकरणासाठी आमची वचनबद्धता दृढ झाली आहे. आमचे ध्येय स्पष्ट आहे – इलेक्ट्रिशियन समुदायाचे कौशल्य वाढविणे, त्यास प्रशिक्षित करणे आणि त्यांना मान्यता देणे. हा कार्यक्रम केवळ आमच्या कॉर्पोरेट मूल्यांशी संरेखित होत नाही, तर तो उद्योगातील कौशल्यांची तफावत कमी करण्याच्या मोठ्या उद्दीष्टात देखील योगदान देतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून, आम्ही इलेक्ट्रिशियनच्या उज्वल आणि आनंदी भविष्याची कल्पना करत आहोत.”
दिल्ली, मुंबई, चेन्नई, मेरठ, कानपूर, लखनौ, गाझियाबाद, कोईम्बतूर, त्रिची, पुणे, नागपूर, जयपूर, बिकानेर, जोधपूर, पटना आणि मुझफ्फरपूर यासह भारतातील अनेक ठिकाणी प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाची व्याप्ती व्यापक आहे. हे पॅन-इंडिया कव्हरेज सुनिश्चित करते की, विविध पार्श्वभूमी आणि प्रदेशातील इलेक्ट्रिशियन या उपक्रमाचा लाभ घेऊ शकतील आणि देशभरातील अधिक कुशल आणि सशक्त मनुष्यबळाला हातभार लावतील.
प्रमाणित आणि अनुभवी प्रशिक्षकांद्वारे सुलभ करण्यात येणारे प्रत्येक सत्र हे, विद्युत व्यापार, आंतरवैयक्तिक कौशल्य आणि डिजिटल आणि आर्थिक साक्षरतेच्या महत्वाच्या पैलूंवर लक्ष केंद्रित करते. इलेक्ट्रिशियनना व्यापक कौशल्यासह सुसज्ज करून, सीएसआर कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे की, त्यांची रोजगारक्षमता वाढवावी आणि त्यांना दीर्घकालीन यशासाठी सक्षम बनवावे. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर, इलेक्ट्रिशियनला ‘स्किल इंडिया’ प्रमाणपत्र मिळते.