टोयोटा त्सुशो आणि सेकॉम भारतातील दुसरे मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल १००० कोटी रुपये खर्चाने बांधणार

पुणे, मार्च २०२४ : व्यापक जनसमूहाकरिता दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या आपल्या धोरणाला अनुसरून साकरा वर्ल्ड हॉस्पिटलने बंगलोरमध्ये नव्या अत्याधुनिक हॉस्पिटलची आपली दूरदृष्टीची योजना जाहीर केली. या बहुराष्ट्रीय रुग्णालय समूहाच्या दहाव्या वर्धापन दिनाचा योग साधून ही योजना जाहीर करण्यात आली. साकरा ही भारताची पहिली १०० टक्के थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय)असलेली मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शृंखला असून जपानची नाविन्यपूर्णता आणि तंत्रज्ञान यांनी ती संचालित होते. आरोग्य क्षेत्रातील दिग्गज कंपनी सेकॉम मेडिकल सिस्टीम आणि व्यापारातील दिग्गज कंपनी टोयोटा यांच्या सहकार्यातून ती निर्माण झाली आहे.

सेकॉम को. लिमिटेडचे कार्यकारी संचालक आणि सेकॉम मेडिकल सिस्टीम कंपनी लिमिटेड जपानचे अध्यक्ष तात्सुरो फ्यूजटोयोटा त्सुशो कॉर्पोरेशन जपानचे डिव्हिजन सीईओ सीनियर एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हिरोशी योनेनागासाकरा वर्ल्ड हॉस्पिटलबेंगळुरुचे व्यवस्थापकीय संचालक युवीची नागानोसाकरा वर्ल्ड हॉस्पिटलबेंगळुरुचे उप व्यवस्थापकीय संचालक नाओया मात्सुमी आणि  साकरा वर्ल्ड हॉस्पिटलबेंगळुरुचे ग्रुप चीफ ऑपरेटिंग ऑफिसर लवकेश फासू यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी साकराच्या विस्ताराच्या योजना तसेच अन्य महत्त्वाच्या उपक्रमांची माहिती देण्यात आली.

साकराचे नवे रुग्णालय उत्तर बंगळुरुतील बनासवाडी येथे मोक्याच्या जागी उभे राहणार आहे. अंदाजे १००० कोटी रुपयांच्या खर्चाने त्याची उभारणी होणार आहे. साकराच्या नव्या रुग्णालयाची क्षमता ५०० खाटांची असून त्याचा बिल्टप एरिया ६००,००० चौ. फूट (५५,७४० मीटर) एवढा असणार आहे. स्थानिक समुदाय तसेच इतरांना असामान्य आरोग्य सेवा पुरविण्याच्या साकराच्या कटिबद्धतेचे प्रतिबिंब या विस्तारात पडले आहे. तसेच आरोग्य सेवेचा हा सर्वात ताजा प्रकल्प वैद्यकीय प्रगती आणि तांत्रिक नाविन्यपूर्णता यांचा अभूतपूर्व संगम भारतात आणत आहे.

एकीकृत आरोग्य सेवेच्या अग्रभागी राहणारे हे नवीन केंद्र स्पेशलिटी आणि सुपर स्पेशालिटी यांची सर्वसमावेशक श्रेणी उपलब्ध करून देईल. यात प्रगत कर्करोग उपचार तसेच अत्याधुनिक पुनर्वसन कार्यक्रमांचा समावेश आहे.

या नव्या प्रकल्पाची घोषणा करताना तात्सुरो फ्यूज म्हणाले, “सेकॉम मेडिकल सिस्टीम आणि टोयोटा यांच्या तज्ज्ञता एकत्रित आणून बंगलुरूमध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देताना आम्हाला अभिमान वाटत आहे. हे नवीन रुग्णालय म्हणजे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय समुदायांच्या आरोग्यसेवेच्या गरजा पूर्ण करण्याच्या आमच्या दृढ कटिबद्धतेचा विस्तार आहे.”

या कार्यक्रमात साकरा वर्ल्ड हॉस्पिटलच्या जागतिक नेतृत्वाने विविध पैलूंची माहिती दिली.यामध्ये या रुग्णालयाचा भारतातील दहा वर्षांचा प्रवासजपानमधील अत्याधुनिक आरोग्य सेवा तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्णता यांचे एकत्रीकरण,तसेच १००० खाटांचा समावेश असलेल्या दुसऱ्या टप्प्यातील विस्ताराची आगामी योजना यांचा समावेश होता. त्यांनी आपले गुंतवणुकीचे धोरण आणि टोयोटा त्सुशो व सेकॉम मेडिकल सिस्टीम यांच्याकडून मिळालेल्या अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची स्थापना यांचीही माहिती दिली. त्यातून अत्युच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवेची हमी देण्यात येईल.