एसव्हीसी बँकेचा केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते सन्मान

मुंबई, मार्च, २०२४: सुमारे ११७ वर्षांचा इतिहास असलेली एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ( अगोदर श्यामराव विठ्ठल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड म्हणून ओळख)च्या वतीने माननीय केंद्रीय गृह व्यवहार आणि सहकार मंत्री श्री. अमित शहा यांच्या शुभ हस्ते सन्मानपत्र प्राप्त झाल्याची घोषणा करण्यात आली. राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित (एनयुसीएफडीसी) च्या पेड-अप कॅपिटलमध्ये एसव्हीसी बँके तर्फे देण्यात आलेल्या योगदानानिमित्त हे सन्मानपत्र देण्यात आले. सहकारी संस्थांमध्ये सहकार्य वाढविणे तसेच शहरी सहकारी बँकिंग (युसीबी) क्षेत्राला बळकट करण्यासाठीचे बँकेचे समर्पण हा गौरव अधोरेखित करतो. नुकताच  दिल्लीत एनयुसीएफडीसी च्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सन्मानपत्र प्रदान सोहळा संपन्न झाला.

एसव्हीसी बँकेचे अध्यक्ष श्री. दुर्गेश चंदावरकर यांनी गौरवपत्राचा स्वीकार केला. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री श्री. अमित शहा यांच्यासह केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा;  केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत किशनराव कराड; सहकार मंत्रालयाचे सचिव डॉ. आशिष कुमार भूटानी; श्री. विवेक जोशी – सचिव, वित्तीय सेवा विभाग, भारत सरकार केंद्रीय मंत्री; एनयुसीएफडीसी चे अध्यक्ष श्री ज्योतिंद्र मेहता आणि नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीजच्या अध्यक्ष  श्री. लक्ष्मी दास हे मान्यवर यावेळी उपस्थित होते.

“एसव्हीसी बँकेचे अध्यक्ष या नात्याने माननीय केंद्रीय मंत्री श्री. अमित शहा यांच्याकडून हे प्रतिष्ठित प्रशंसापर प्रमाणपत्र स्वीकारताना मला खूप अभिमान वाटतो आहे. हा गौरव सहकार्याला चालना देण्यासोबत सहकारी बँकिंग क्षेत्राच्या वाढीस पाठिंबा देण्यासाठी एसव्हीसी बँकेच्या वचनबद्धतेची पुष्टी करतो. आम्हाला एनयुसीएफडीसी मध्ये योगदान दिल्याबद्दल अभिमान वाटतो आणि देशभरातील युसीबी सक्षमीकरणासाठी आम्ही समर्पित आहोत. हा सन्मान संपूर्ण टीमचे सामूहिक प्रयत्न तसेच सेवेतील उत्कृष्टतेसाठीच्या आमच्या अतूट वचनबद्धतेचा पुरावा आहे,”  असे एसव्हीसी बँक’चे अध्यक्ष श्री. दुर्गेश चंदावरकर म्हणाले.