सह्याद्रि हॉस्पिटल्समध्ये अनोख्या कॉन्ट्रास्ट-फ्री अँजिओप्लास्टीच्या साहाय्याने धमनीमधील गंभीर स्वरूपाच्या ब्लॉकेजवर यशस्वी उपचार

पुणे, मार्च 2024: सोलापुरातील अकलूजचे रहिवासी, ६२ वर्षांचे सेवानिवृत्त गृहस्थ श्री संजय यादव (नाव बदलण्यात आले आहे) यांच्यावर सह्याद्रि हॉस्पिटल्समध्ये एक क्रांतिकारी वैद्यकीय प्रक्रिया करून पॉप्लिटल धमनीच्या गंभीर स्टेनोसिसमुळे पायातील वेदनांवर यशस्वी उपचार करण्यात आले. २०१७ साली श्री यादव यांच्यावर रेनल ट्रान्सप्लान्ट सर्जरी करण्यात आली होती, त्यामुळे कॉन्ट्रास्ट एजंट्सच्या वापराशी संबंधित संभाव्य धोक्यांमुळे श्री यादव यांच्यासमोर एक वेगळेच वैद्यकीय आव्हान होते, खासकरून किडनीशी संबंधित नुकसान होण्याची दाट शक्यता होती.

श्री. गाढवे यांना शरीरातील मांडी आणि गुडघ्याच्या भागाला रक्तपुरवठा करणारी प्रमुख रक्तवाहिनी असलेल्या पोप्लिटियल धमनीमध्ये लक्षणीय अडथळे असल्याचे निदान झाले होते, ज्यामुळे त्यांच्या पायाला रक्तपुरवठा कमी होत होता आणि तीव्र वेदना सहन कराव्या लागत होत्या, ज्याला सामान्यतः “लेग अटॅक” म्हणून ओळखले जाते. त्यांना त्वरीत सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि त्यांची मिनिमली इनवेसिव्ह अँजिओप्लास्टी करण्यात आली. शरीरावर खूपच कमी चिरा देऊन ही प्रक्रिया केली जाते. अँजिओप्लास्टीमध्ये कॉन्ट्रास्ट एजंटचा वापर केला जातो पण या सर्जरीच्या बाबतीत विशेष बाब म्हणजे यामध्ये कॉन्ट्रास्ट एजंटचा वापर केला गेला नाही कारण तसे केल्याने श्री यादव यांच्या ट्रान्सप्लान्टेड किडनीला धोका होऊ शकला असता. रक्तवाहिन्या पाहण्यासाठी कार्बन डायऑक्साइडचा वापर करण्यात आला, अशाप्रकारे कोणत्याही कॉन्ट्रास्ट एजंटचा वापर न करता संपूर्ण प्रक्रिया करण्यात आली.

पुण्यातील सह्याद्रि हॉस्पिटल्समधील इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉ कौरभी झाडे यांनी ही प्रक्रिया केली, कॉन्ट्रास्ट एजंट्सशी संबंधित जोखीम कमी करण्यासाठी आणि किडनीच्या कार्यावर संभाव्य नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी या अनोख्या पद्धतीच्या महत्त्वावर भर दिला. त्या म्हणाल्या, “या रुग्णाचे रेनल ट्रान्सप्लान्ट झालेले होते, त्यामुळे किडनीला संभवणारा धोका कमी करण्यासाठी कॉन्ट्रास्ट एजंट्सचा वापर टाळणे खूप आवश्यक होते. या केसमध्ये अँजिओप्लास्टीसाठी कार्बन डायऑक्साइडचा यशस्वी वापर सह्याद्रि हॉस्पिटल्समधील उपचार प्रक्रिया प्रत्येक रुग्णाच्या गरजेनुसार आणि सुरक्षित असाव्यात याप्रती आमची बांधिलकी दर्शवतो.”

अँजिओप्लास्टी यशस्वी झाल्यामुळे श्री यादव यांना “लेग अटॅक” मुळे पायात होणाऱ्या गंभीर वेदनांपासून मुक्ती मिळाली, इतकेच नव्हे तर, किडनीला दुखापत होण्याचा धोका देखील कमी झाला. रेनल ट्रान्सप्लान्ट झालेल्या रुग्णांच्या बाबतीत ही खूप मोठी जोखीम असते. या प्रक्रियेमध्ये शरीरावर खूप जास्त जखमा होत नाहीत त्यामुळे टाके घालावे लागले नाहीत आणि २४ तासांच्या आत श्री यादव स्वतःच्या पायांनी चालत घरी गेले.

श्री यादव यांची केस वैद्यकीय उपचारांमध्ये अभिनव तंत्रांच्या यशस्वी वापराचे आदर्श उदाहरण ठरली आहे. या केसने रुग्ण-केंद्रित, जोखीम कमी करणाऱ्या देखभालीच्या एका नव्या युगाची सुरुवात केली आहे. या क्रांतिकारी केसने व्यक्तिगत रुग्ण देखभालीचे, खासकरून रेनल ट्रान्सप्लान्ट झालेल्या रुग्णांची विशेष काळजी घेण्याचे महत्त्व अधोरेखित करून किडनीच्या आरोग्याच्या बाबतीत तडजोड न करता धमनीच्या गंभीर स्थितीवर यशस्वी व सुरक्षित उपचारांचे एक उदाहरण उपलब्ध करवून दिले आहे. किडनीच्या समस्या असलेल्या रुग्णांमध्ये कॉन्ट्रास्ट एजंट्स वापरण्याच्या तोट्यांमध्ये कॉन्ट्रास्टमुळे नेफ्रोपॅथीचा धोका असतो, यामुळे किडनीचे आरोग्य खालावते.