2023 मध्ये अर्ध्याहून अधिक भारतीय इक्विटी लार्ज-कॅप फंडांनी त्यांच्या मापदंडापेक्षा कमी कामगिरी केली

मुंबई, मार्च २०२४ : जगातील आघाडीचे निर्देशांक पुरवठादायर एस अँड पी डाऊ जोन्स इंडायसेस (“S&P DJI”) ने आज डिसेंबर 2023 मध्ये संपणाऱ्या वर्षाचे एस अँड पी निर्देशांक विरुद्ध सक्रिय निधी (SPIVA®) इंडिया स्कोअरकार्ड प्रकाशित केले. गेल्या वर्षात विविध सर्व श्रेण्यांमध्ये सक्रिय निधी व्यवस्थापकांमधील वेगवेगळी कामगिरी दिसून आली. निम्म्याहून अधिक भारतीय इक्विटी लार्ज-कॅप फंड मापदंडाइतकी कामगिरी करण्यात अयशस्वी ठरले. सक्रियपणे व्यवस्थापित फंडांपैकी 52% फंडांनी S&P BSE 100 पेक्षा कमी कामगिरी केली. फक्त ३०% भारतीय ELSS फंडांनी S&P BSE 200 या त्यांच्या मापदंडापेक्षा कमी कामगिरी केली आणि ही एकमेव श्रेणी आहे जिथे बहुसंख्य फंडांनी मागील वर्षाच्या संबंधित मापदंडा एवढी बाजी मारली. 

एसपीआयव्हीए इयर-एंड 2023 अहवालात पुढे नमूद केले आहे की भारतीय इक्विटी मिड-/स्मॉल-कॅप फंड साठी बेंचमार्क S&P BSE 400 MidSmallCap निर्देशांक, 2023 मध्ये 44.% ने वाढला आणि 74% सक्रिय व्यवस्थापकांनी त्या कालावधीत या निर्देशांकाची कामगिरी कमी केली. या फंड श्रेणीने दीर्घकाळात सर्वात वाईट कामगिरी केली, त्यापैकी 75% डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या 10 वर्षांच्या कालावधीत S&P BSE 400 MidSmallCap निर्देशांकात मागे आहेत.

अहवालानुसार, 2023 मध्ये S&P BSE इंडिया गव्हर्नमेंट बाँड इंडेक्स 7.9% ने वाढला आणि 2023 मध्ये पाचव्या पेक्षा कमी सक्रिय व्यवस्थापकांनी या श्रेणीतील बेंचमार्कला मागे टाकले. त्यामुळे कमी कामगिरीचा दर 82% वर आला. त्याचप्रमाणे, S&P BSE इंडिया बाँड इंडेक्स 8.0% वाढला, तर SPIVA इंडिया स्कोअरकार्डमध्ये भारतीय कंपोझिट बाँड फंड व्यवस्थापकांची कमी कामगिरी 96% इतकी सर्व श्रेणींमध्ये सर्वाधिक होती. एक विशेष पैलू प्रकाशात आला तो म्हणजे कोणत्याही काळातील सर्व श्रेण्यांमध्ये सर्वाधिक कमी कामगिरी दर 99.1% असताना 10 वर्षांच्या कालावधीत 116 भारतीय कंपोझिट बाँड फंडांपैकी फक्त एकाने निर्देशांकाला मागे टाकले, चांगली कामगिरी केली.  

अहवालात जागतिक बाजारपेठेची परिस्थिती आणि इतर बाजारपेठांमध्ये भारत कसा उभा राहिला याचाही विचार करण्यात आला. SPIVA इयर-एंड 2023 ने भारताला जागतिक शेअर बाजारातील रॅलीच्या प्रमुखांमध्ये स्थान दिले आहे आणि सर्व निरीक्षण केलेल्या इक्विटी बेंचमार्कने वर्षभरात 20% पेक्षा जास्त वाढ नोंदवली आहे. भारतीय बाँड मार्केटचे वर्ष देखील मजबूत होते ज्यामध्ये उच्च एकेरी अंकांमध्ये वार्षिक परतावा (8.0%) होता. 

एस अँड पी डाऊ जोन्स इंडायसेसच्या निर्देशांक गुंतवणूक धोरण विभागाचे संचालक बेनेडेक व्होरोस म्हणाले, “गेल्या वर्षाचा विचार करता बाजारातील उत्साह निर्विवाद आहे. S&P BSE 100 आणि S&P BSE 200 निर्देशांकांनी अनुक्रमे 23.2% आणि 24.5% ची वाढ नोंदवली आहे. व्याजदर आणि वस्तूंच्या किमती स्थिर करत पाहिल्या गेलेल्या मोठ्या आर्थिक वातावरणामुळे टिकून राहिलेल्या भारतीय बाजारांसाठी ही कामगिरी महत्त्वपूर्ण वर्ष अधोरेखित करते.

अहवाल 1a: निर्देशांकाने केलेल्या निधीची टक्केवारी (संपूर्ण परताव्यावर आधारित)

फंड श्रेणी तुलना निर्देशांक १वर्ष (%) ३-वर्ष (%) ५-वर्ष(%) १०वर्ष(%)
भारतीय इक्विटी लार्ज-कॅप S&P BSE 100 51.61 87.50 85.71 62.10
भारतीय ELSS S&P BSE 200 30.00 53.66 70.73 67.57
भारतीय इक्विटी मिड-/स्मॉल-कॅप S&P BSE 400 MidSmallCap Index 73.58 60.00 58.14 75.41
भारतीय कॉम्पोझीट बाँड S&P BSE India Bond Index 95.59 67.63 88.89 99.14
भारतीय सरकारी  बाँड S&P BSE India Government Bond Index 81.48 75.00 64.00 90.00

 

स्रोत: S&P Dow Jones Indices LLC, Morningstar, Association of Mutual Funds in India. 31 डिसेंबर 2023 पर्यंतचा डेटा. INR मधील एकूण परताव्यावर आधारित निर्देशांक कामगिरी. S&P BSE 400 MidSmallCap निर्देशांक 30 नोव्हेंबर 2017 ला सादर करण्यात आला. S&P BSE इंडिया गव्हर्नमेंट बाँड इंडेक्स आणि S&P BSE इंडिया बॉन्ड इंडेक्स 12 मार्च 2014 ला सादर करण्यात आले. इंडेक्स सादरीकरण तारखेपूर्वीचा सर्व डेटा पूर्व परीक्षित चाचणीवर आधारित डेटा आहे. मागील कामगिरी ही भविष्यातील परिणामांची हमी नाही. वर दिलेला तक्ता स्पष्टीकरणाच्या उद्देशाने तयार केला आहे आणि अंदाजानुरूप ऐतिहासिक कामगिरी प्रतिबिंबित करतो. पूर्व चाचणी केलेल्या कामगिरीशी संबंधित अंतर्निहित मर्यादांसंबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया या माहितीपत्राच्या शेवटी दिलेले कामगिरी प्रकटीकरण पहा.