पुणे, मार्च 2024: महिंद्रा समुहाचा रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा विकासातील महत्त्वाचा विभाग महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेडने (MLDL) महिंद्रा कोडनेम क्राऊन लॉन्च करण्याची घोषणा केली. वर्ल्ड ट्रेड सेंटरपासून अवघ्या 4 किमी अंतरावर, खराडी ॲनेक्समध्ये हा कॉम्प्लेक्स असेल. 5.38 एकर्स एवढ्या विस्तृत जागेवर वसलेल्या या कॉम्प्लेक्समध्ये, महिंद्रा कोडनेम क्राऊन येथे 2, 3 आणि 4 BHK घरे उपलब्ध आहेत. आलिशान राहणीमानाचा अनुभव देणाऱ्या या कॉम्प्लेक्सला 04 मार्च 2024 रोजी RERA मिळाले.
पहिल्या टप्प्यात 2 आणि 3 BHK घरांच्या दोन टॉवर्सचे आणि 500 हून अधिक घरांचा समावेश असलेल्या विशेष 4 BHK टॉवरचे उद्घाटन होईल. मालकीचे घर हे सातत्याने बदलले जात नाही, त्यामुळे जे घर घेतले जाते, ते कुटुंबाच्या सगळ्या गरजा पूर्ण करणारे आणि प्रशस्त असावे अशी अपेक्षा असते. महिंद्रा कोडनेम क्राऊन हे नेमके हाच विचार करून बांधण्यात आलेले आहे. तसेच या प्रकल्पाची रचना मोठे डेक, क्रॉस-व्हेंटिलेशन, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ शौचालये आणि इतर अशा वैशिष्ट्यांसह करण्यात आली आहे.
महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार सिन्हा म्हणाले,
“महिंद्रा कोडनेम क्राऊन हा आमचा नवीन आणि आलिशान प्रकल्प पुणेकरांसाठी सादर करण्यास आम्ही उत्सुक आहोत. ग्राहकांचे जगणे समृद्ध करण्याबरोबरच त्यांच्या गरजांना प्राधान्य देणे, हेच आमचे ध्येय आहे. पुण्याच्या IT हबच्या बाजूलाच वसलेल्या आमच्या या प्रकल्पामुळे त्याचे मूल्य आणखी वाढते. तसेच आमच्या ग्राहकांना आरामदायी आणि आधुनिक जीवनशैली मिळते. कॉम्पेक्समध्ये मिळणाऱ्या सुविधा महत्त्वाच्या असतातच, पण महिंद्र कोडनेम क्राऊन येथे आम्ही घराला, घराच्या रचनेला जास्त महत्त्व देतो. जेणेकरून ग्राहकांसाठी येथे राहणे सुखावह आणि आनंदी होईल.
Mahindra Codename Crown हे पूर्व पुणे परिसरात वसलेले आहे. हे इतक्या मोक्याच्या ठिकाणी आहे, की याच्या आसपास वेलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल, युरो स्कूल आणि पोद्दार इंटरनॅशनल स्कूल यांसारख्या उच्च शैक्षणिक संस्था आहेत. यासोबतच विमान नगर, मगरपट्टा आणि हडपसरमधील आयटी हबसोबत याची उत्तम कनेक्टिव्हिटी आहे.