वेदांताच्या बाल्को मेडिकल सेंटरला प्रतिष्ठित कॅन्सर ग्रँड चॅलेंजेस पुरस्कार, भारताचा हा पहिलाच पुरस्कार

पुणे, मार्च 2024: भारतातील ऑन्कोलॉजी क्षेत्रातील एक उदयोन्मुख विभाग, वेदांताच्या बाल्को मेडिकल सेंटरने (BMC), प्रतिष्ठित कॅन्सर ग्रँड चॅलेंजेस पुरस्कार प्राप्त करणाऱ्या संघातील पहिले भारतीय सह-संशोधक बनून एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. या पुरस्कारासह कर्करोग संशोधनासाठी 25 दशलक्ष डॉलर्सचे अनुदान भारतातील ऑन्कोलॉजी क्षेत्रातील एक अग्रणी संस्था म्हणून BMC चे स्थान अधोरेखित करते. बाल्को मेडिकल सेंटर आणि जगभरातील इतर प्रतिष्ठित संस्थांमधील चिकित्सक, अधिवक्ता आणि शास्त्रज्ञ यांचा समावेश असलेली पुरस्कार प्राप्त टीम प्रॉस्पेक्ट कर्करोगाच्या सुरुवातीच्या गंभीर समस्येवर लक्ष देईल.

वेदांत मेडिकल रिसर्च फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुश्री ज्योती अग्रवाल यांनी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, “कॅन्सरविरुद्धच्या लढाईत लक्षणीय प्रगती करणाऱ्या या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल आम्हाला आमचा अभिमान वाटतो. गेल्या सहा वर्षांत, बीएमसीमध्ये, आमचे नेते, कर्मचारी आणि भागधारकांनी आम्हाला सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे, तसेच आमचे रुग्ण आणि समुदायाला सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. कॅन्सर ग्रँड चॅलेंजेसच्या या पाठिंब्यामुळे आमच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे. या अशा सहकार्यामुळे आणि प्रयत्नांमुळे, आम्ही आरोग्यसेवेत सकारात्मक योगदान देऊ शकतो.”

कॅन्सर ग्रँड चॅलेंजेसद्वारे ज्यांना यंदा निधी देण्यात आला, अशा पाच जागतिक संघांपैकी टीम PROSPECT ही एक आहे. याची स्थापना 2020 मध्ये कर्करोग संशोधन यूके आणि नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट यूएस यांनी केली होती. विविध जागतिक दर्जाच्या संशोधन संघानी एकत्र येत वेगळा विचार मांडावा आणि कर्करोगाची काही कठीण आव्हानांवर मात करण्यासाठी प्रयत्न करावेत, हा त्यामागचा उद्देश आहे. कॅन्सर रिसर्च यूके, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, कॅन्सर रिसर्च यूके आणि इन्स्टिट्यूट नॅशनल डू कॅन्सर द्वारे कॅन्सर ग्रँड चॅलेंजेसच्या माध्यमातून कॅन्सर रिसर्चमधील काही कठीण आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एकूण 125 मिलियन डॉलर्स गुंतवणुकीद्वारे संघांना निधी दिला जाईल.

आमचे दूरदर्शी भागीदार आणि संशोधकांच्या नेटवर्कमुळे, कॅन्सर ग्रँड चॅलेंज हे जगभरातील चांगल्या आणि हुशार व्यक्तींना एकत्र आणते. यासाठी देशाच्या सीमांचाही अडथळा येत नाही. कारण, या सर्वांचे उद्दिष्ट कर्करोगाच्या कठीण समस्यांवर मात हे असते, असे कॅन्सर ग्रँड चॅलेंजेसचे संचालक डॉ. डेव्हिड स्कॉट म्हणाले. “ही आजपर्यंतची आमची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. यासह आम्ही जागतिक संशोधन समुदाय वाढवत आहोत. आणि कर्करोगाच्या परिणामांवर सकारात्मक परिणाम करू शकणाऱ्या नवीन संघांना निधी देत आहोत.

वेदांताचे बाल्को मेडिकल सेंटर हे मध्य भारतातील आधुनिक सामुग्रीने सज्ज असलेले ऑन्कोलॉजी केंद्र आहे, जे कर्करोगाच्या उपचारांमध्ये आघाडीवर आहे. वेगवेगळ्या कर्करोगांवर उपचार आणि रुग्णांना गरजेचा असलेला धीर येथे दिला जातो. प्रगत रेडिएशन थेरपी, ब्रेकीथेरपी, न्यूक्लियर मेडिसिन, शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि इतर अनेक उपचारांसाठी ही संस्था रेफरल सेंटर म्हणून ओळखली जाते. मार्च 2018 मध्ये या केंद्राची स्थापना झाली, तेव्हापासून बीएमसीने 37,000 हून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत. याव्यतिरिक्त, संस्थेला LEED प्रमाणपत्र, NABH, FSSAI, NABL, नर्सिंग एक्सलन्स, CAHO प्रमाणपत्रांसह अनेक प्रमाणपत्रे आणि मान्यता प्राप्त मिळाली आहे. हे महत्त्वपूर्ण अनुदान भारतातील गंभीर आरोग्य आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संशोधन आणि नाविन्यपूर्ण उपाय देण्यासाठी BMC ची वचनबद्धता अधोरेखित करते.

डॉ. भावना सिरोही, वेदांत मेडिकल रिसर्च फाउंडेशन (बाल्को मेडिकल सेंटर) मधील वैद्यकीय संचालक आणि PROSPECT-इंडिया अभ्यासाच्या प्रमुख संशोधक म्हणतात, “कोलोरेक्टल कॅन्सरमधील चिंताजनक वाढ लवकर निदान आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जीवनशैली निवडीवर भर देते. विशेषत: तरुण लोकसंख्या पाहता लवकर निदान आणि त्वरित उपचार सुलभ करण्यासाठी कर्करोग तपासणी केंद्रांची नितांत गरज आहे. या अनुदानामुळे कोलोरेक्टल कॅन्सर होण्यामागील कारणे आणि प्रतिबंधात्मक धोरणे समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करून, जागतिक कर्करोग संशोधनाला गती मिळेल.”

कोलोरेक्टल कॅन्सर (EOCRC) ही 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींमधील एक महत्त्वाची जागतिक समस्या आहे. टीम PROSPECT चे उद्दिष्ट विकासाचे मार्ग शोधणे, जोखीम घटक समजून घेऊन त्याचे निराकरण करणे हे आहे. EOCRC ला प्रोत्साहन देण्यासाठी सामान्य जैविक प्रक्रियांमध्ये व्यत्यय आणणारी कारणे समजून घेणे आणि ते बदलण्याचा प्रयत्न करणे हा संघाचा प्रयत्न आहे. कोलोरेक्टल कॅन्सरचे लवकर निदान आणि त्यावर मात करण्यासाठी नवनवीन प्रकार अवलंबणे अशी यांची कार्यपद्धती आहे.

सध्या, कॅन्सर ग्रँड चॅलेंजेससमोर 13 आव्हाने असून त्यासाठी त्यांनी जगभरातील 1,200 संशोधक आणि 16 संघ एकत्र आणले आहेत. परतफेडीची भावना ही वेदांताच्या मूलभूत मूल्यांचा भाग आहे. आपल्या प्रयत्नांचे होत असलेले कौतुक हे नव्याने जोमाने काम करायला बळ देते. यामुळे समाजासाठी योगदान देणे आणि समाजावर कायमस्वरूपी प्रभाव टाकण्याचे स्वप्न पूर्ण होणे, अशक्य वाटत नाही.