होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियातर्फे ग्राहकांना क्रांतीकारक अनुभव देण्यासाठी ‘स्मार्ट वर्कशॉप ’ मोबाइल अ‍ॅप लाँच

गुरुग्राम, २१ मार्च २०२४ – होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (एचएमएसआय) कंपनीला स्मार्ट वर्कशॉप मोबाइल अ‍ॅप लाँच करताना अभिमान वाटत आहे. स्मार्ट वर्कशॉप मोबाइल अ‍ॅप वाहन उद्योगातील पहिले नाविन्यपूर्ण उत्पादन असून ते ग्राहकांना त्यांच्या वाहनाच्या सर्व्हिसिंगची प्रत्यक्ष वेळेतील माहिती पुरवणार आहे. हे अ‍ॅप एचएमएसआयची आपल्या मौल्यवान ग्राहकांना सोयीस्कर व पारदर्शक सेवा देण्याची बांधिलकी दर्शवणारे आहे.

स्मार्ट वर्कशॉप ’ अ‍ॅपच्या मदतीने ग्राहकांना एकाच एसएमएस लिंकद्वारे वाहनाच्या सर्व्हिसिंगमधल्या प्रत्येक स्तराची माहिती जाणून घेता येईल. सर्व्हिस सेंटरमध्ये ग्राहकाचे वाहन व्हिइकल इन- व्हिइकल रिपेयर- व्हिइकल आउट अशा वेगवेगळ्या पातळीमधून जात असते. वाहनाच्या सर्व्हिसिंगची प्रत्येक पातळी पूर्ण झाल्यानंतर ग्राहकाला एसएमएसद्वारे पाठवलेल्या लिंकच्या माध्यमातून सर्व्हिसिंग प्रत्येक स्तरातली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोटिफिकेशन मिळेल व पर्यायाने ग्राहकला आपल्या वाहनाची अद्ययावत माहिती मिळत राहील.

एचएमएसआयद्वारे पुढील वर्षाच्या अखेरप४यंत भारतातील सर्व अधिकृत मुख्य वितरक सर्व्हिस सेंटर्समध्ये टप्प्याटप्प्याने स्मार्ट वर्कशॉप मोबाइल अ‍ॅपचा विस्तार केला जाणार आहे. याची अमलबजावणी हैद्राबाद, पुणे, जयपूर आणि मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरांतून सुरू झाली आहे. या अ‍ॅपमुळे ग्राहकांचा प्रतीक्षा करण्याचा वेळ कमी होईल, सर्व्हिसिंगचा टप्पा जाणून घेऊन त्यानुसार आपल्या दिवसाचे नियोजन करता येईल, शिवाय सर्व्हिसिंगशी संबंधित अतिरिक्त शिफारसीबद्दल पारदर्शकता राहील. ग्राहकांनी अभिप्राय दिल्यास त्यावर जलद कार्यवाही केली जाईल व त्याचप्रमाणे वाहनाचे वितरण आणि वर्कशॉपमधील आउट प्रोसेस सहजपणे पार पडेल.

स्मार्ट वर्कशॉप मोबाइल अ‍ॅप लाँच करण्याविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक श्री. योगेश माथुर म्हणाले, ‘ग्राहक समाधान आणि नाविन्यप्रती असलेल्या बांधिलकीतून आम्ही स्मार्ट वर्कशॉप मोबाइल अ‍ॅप तयार केले आहे. या क्रांतीकारी साधनाच्या मदतीने ग्राहकांना पारदर्शक सेवा तसेच सर्व्हिसिंगचा सुरळीत आणि सोयीस्कर अनुभव मिळेल. या अ‍ॅपचे लाँच तंत्रज्ञानाचा ग्राहकांना लाभ करून देण्याची एचएमएसआयची बांधिलकी दर्शवणारे आहे.’

स्मार्ट वर्कशॉप मोबाइल अ‍ॅपची महत्त्वाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे

रियल- टाइम व्हिइकल रिपेयर ट्रॅकिंग – ग्राहकस्नेही इंटरफेजच्या माध्यमातून ग्राहकांना वाहनाच्या सर्व्हिसिंगमधल्या प्रत्येक पायरीची माहिती जाणून घेता येईल. यामुळे संपूर्ण सर्व्हिसिंग प्रक्रिया पारदर्शक राहील व पर्यायाने ग्राहकाची मनःशांती जपली जाईल.

रांग व्यवस्थापन यंत्रणा – घाईच्या वेळेस हे अ‍ॅप ग्राहकांना कस्टमर लाउंजमध्ये आरामदायीपणे प्रतीक्षा करण्यासाठी मदत करते व दरम्यान वर्कशॉपमध्ये वाहनाच्या सर्व्हिसिंगमधली प्रत्येक स्टेप जाणून घेता येते.

एसएमएस लिंकच्या माध्यमातून अभिप्राय देण्याची सुविधा – सोयीस्कर एसएमएस लिंकद्वारे ग्राहकांचा अमूल्य अभिप्राय जाणून घेत सातत्याने सुधारणा करण्याची व ग्राहक समाधान उंचावण्याची संधी मिळते.