बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे अखिल भारतीय हिंदी परिसंवाद

20 मार्च २०२४ – बँक ऑफ महाराष्ट्र ही देशाच्या सार्वजनिक बँकिंग क्षेत्रांतील अग्रगण्य बँक
आहे. बँक ऑफ महाराष्ट्राने देशातील सर्व बँका, वित्तीय संस्था व विमा कंपन्यांसाठी “भविष्यातील
बँकिंग“ या विषयावर नवी दिल्ली येथे एक अखिल भारतीय परिसंवाद आयोजित केले होते. भारत
सरकारच्या गृह मंत्रालयातील राजभाषा विभागाच्या सचिव व भारतीय प्रशासकीय सेवेतील
अधिकारी श्रीमती अंशुली आर्य या परिसंवादाच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. बँक ऑफ
महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक श्री आशिष पांडे, हे परिसंवादाच्या अध्यक्षपदी होते. बँक ऑफ
महाराष्ट्राच्या सरव्यवस्थापिका श्रीमती चित्रा दातार,राजभाषा व मनुष्यबळ विभागाचे
सरव्यवस्थापक श्री के राजेश कुमार, दिल्ली विभागाचे विभागीय व्यवस्थापक श्री हरीशंकर
वत्स आणि राजभाषा विभागाचे उपसरव्यवस्थापक डॉक्टर राजेंद्र श्रीवास्तव हे परिसंवादात
प्रामुख्याने उपस्थित होते.

वित्त मंत्रालयाच्या वित्त सेवा विभागातील संचालक श्री जगजीत कुमार आणि उपसंचालक
श्री धरमबीर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. सर्व बँका, वित्तीय संस्था व विमा
कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी व हिन्दी राजभाषा अधिकारी हे देखील परिसंवादात उपस्थित
होते.

राजभाषा विभागाच्या सचिव व भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी श्रीमती अंशुली
आर्य यांनी आपल्या संबोधनात बँका व वित्तीय संस्था या देशाचा कणा आहेत असे सांगितले.तसेच सर्व बँका या अनेक सेवांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना
कार्यान्वित करत असतात असे त्या म्हणाल्या.सद्य परिस्थितीत बँकिंग व्यवसायात हिंदी व
प्रादेशिक भाषांचा उपयोग अतिशय महत्वाचा असून त्यामुळे दुर्गम भागातील ग्राहकांना
देखील याचा लाभ होईल असे प्रतिपादन श्रीमती अंशुली आर्य यांनी केले. बँक ऑफ
महाराष्ट्र व अन्य संस्थांनी या दिशेने केलेल्या व करीत असलेल्या प्रयत्नांचे देखील श्रीमती
अंशुली आर्य यांनी कौतुक केले.

राजभाषा व मनुष्यबळ विभागाचे सरव्यवस्थापक श्री के राजेश कुमार यांनी सर्व सहभागी
व्यक्तींचे स्वागत केले. परिसंवादात “भविष्यातील बँकिंग“ या विषयावर चर्चासत्र व
परिचर्चा आयोजित करण्यात आल्या.व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी “महाबँक प्रगती“
या अंतर्गत मासिकाचा व त्याच्या ब्रेल लिपीतील आवृत्तीचे प्रकाशन केले. तसेच या प्रसंगी
बँकेच्या हिंदी भाषेतील विविध उपयोजनांचे देखील विमोचन करण्यात आले. तसेच बँक
ऑफ महाराष्ट्राने आयोजित केलेल्या अखिल भारतीय हिंदी निबंध स्पर्धेतील विजेत्यांना या
प्रसंगी पारितोषके देण्यात आली.

बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक श्री आशिष पांडे यांनी येत्या काळातील बँकिंगचे भविष्य
या विषयावरील भविष्य जाणून घेणे औत्सुक्याचे ठरेल असे सांगितले. परंपरागत बँकिंग पासून
आज आम्ही इंटरनेट , मोबाईल बँकिंग आणि संभाषणात्मक बँकिंग पर्यत आम्ही आज पोहोचलो
असल्याचे प्रतिपादन श्री पांडे यांनी केला. बाजारपेठेच्या आणि नवीन पिढीतील ग्राहकांच्या
अपेक्षांनुसार बँका व वित्तीय संस्थांनी कृत्रिम प्रज्ञा, सामुहिक संगणन, इत्यादी सारख्या नवीन
तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन श्री आशिष पांडे यांनी केले. आपल्या योजना आणि
संकल्पना दूरस्थ व दुर्गम भागात प्रसारित करण्यासाठी हिंदी व प्रादेशिक भाषा हे सशक्त मध्यमअसल्याचे श्री आशिष पांडे यांनी सांगितले.

दिल्ली विभागाचे विभागीय व्यवस्थापक श्री हरीशंकर वत्स यांनी आभार प्रदर्शन केले.