महिला दिनानिमित्त हॉकी महाराष्ट्र आणि पुनीत बालन ग्रुपकडून महिला हॉकीपटूंचा सन्मान

पुणे, मार्च २०२४ : हॉकी महाराष्ट्र आणि पुनीत बालन ग्रुप यांनी संयुक्त विद्यमाने सध्याच्या महाराष्ट्रीय महिला हॉकीपटूंच्या उल्लेखनीय कामगिरीला गौरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात महिला हॉकीपटूंचा विशेष सन्मान करण्यात आला. हॉकी महाराष्ट्राने रजनी टिमरपु, वैष्णवी फाळके, अक्षता ढेकळे आणि ऋतुजा पिसाळ या चार खेळाडूंचा सत्कार केला. हे चारही खेळाडूंनी ज्युनियर आणि सीनियर स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
त्याबरोबरच इतर सात खेळाडू ज्यांनानिवड प्रक्रियेसाठी विविध भारतीय शिबिरांसाठी बोलावण्यात आले होते, त्यांचा ही समावेश होता. शिबिरात सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये मनुश्री शेडगे, प्रियांका वानखेडे, काजल आटपाडकर, हिमांशीगावंडे, शशी प्रभा, अश्विनी कोळेकर आणि भावना खाडे यांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या हॉकीमधील कौशल्याला मान देण्यासाठी गेल्या ५ वर्षात ज्यांनी सर्वोच्च पातळीवर भारतीय हॉकीला योगदान दिले त्यांचा सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात अनेक अधिकारी आणि क्रीडा समर्थक उपस्थित होते.
हॉकी महाराष्ट्र आणि आयोजन समितीचे अध्यक्ष तथा अतिरिक्त पोलीस महासंचालक आयपीएस कृष्णप्रकाश यांनी दूरध्वनीवरून खेळाडू मुलींना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. ते म्हणाले, “आपल्या संघाने आपल्या पुणे शहरातच चांगली कामगिरी बजावून तसेच गौरव मिळवण्याचे लक्ष ठेवून येत्या स्पर्धेमध्ये भाग घेणे हा आमच्यासाठी मोठा क्षण आहे.”
त्यानंतर, या कार्यक्रमात बोलताना हॉकी महाराष्ट्रचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि संघटक सचिव मनोज भोरे यांनी खेळाडूंच्या समर्पण आणि चिकाटीबद्दल त्यांचे कौतुक केले. राज्यभरातील महत्त्वाकांक्षी तरुण खेळाडूंना प्रेरणादेण्यावर व त्यांचे यश ओळखून ते साजरे करण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. ते म्हणाले, “हा खरोखरच अभिमानाचा क्षण असून आपण (हॉकी महाराष्ट्र) योग्य दिशेने जात आहोत हे निश्चितपणे दिसत आहे”
तसेच हॉकी महाराष्ट्रचे सरचिटणीस आणि संयोजक, मनीष आनंद यांनी या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त केला आणि संपूर्ण महाराष्ट्रात या खेळाला पाठिंबा आणि प्रोत्साहन देण्यासाठी संघटनेच्या वचनबद्धतेचे कौतुक केले. ते म्हणाले, “आपल्या संघात कौशल्य भरपूर आहे आणि आम्हाला काही खेळाडू सादर करताना अभिमान वाटतो. ते आजचे सितारे असून इतरांसाठी मोठे उदाहरण आहेत”
यावेळी ध्यानचंद पुरस्कार विजेत्या स्मिता शिरोळे, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते क्लेरेन्स लोबो,शहर काँग्रेस महिला विंग अध्यक्ष पूजा आनंद, आणि हॉकी महाराष्ट्रचे सीओओ आणि सह संयोजक मेहेर प्रकाश तिवारी उपस्थित होते.
हाकार्यक्रम राज्यातील महिला हॉकीपटूंना योग्यआदर होता. त्यांनी खेळातील त्यांच्यायोगदान बद्दल विचार सांगितले आणि  स्वतःचे यश साजरे केले.
दरम्यान, येत्या आठवड्यात खेळल्या जाणाऱ्या 14 व्या हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय स्पर्धेसाठी 18 संघाची घोषणा करण्यात आली. त्याचप्रमाणे हॉकी महाराष्ट्रचे सरचिटणीस मनीष आनंद यांच्या हस्ते संघाच्या जर्सी व किटचे अनावरण देखील करण्यात आले. संघाचे नेतृत्व मिडफिल्डर वैष्णवी फाळके करणार आहे.
संघ
गोलकीपर्स – सुश्मिता पाटील, रजनी एतिमारपू
डिफेंडर्स – निर्जला शिंदे, ऐश्वर्या दुबे, शशी प्रभा चतुर्वेदी, अक्षता ढेकळे.
मिडफिल्डर – वैष्णवी फाळके (कर्णधार), भावनाखाडे, दुर्गा शिंदे, मनश्री शेडगे, शालिनी साकुरे, दीक्षा अवघडे
फॉर्वर्डस – हिमांशु गावंडे, काजल आटपाडकर, आकांशा सिंह, प्रियांका वानखेडे, योगिता बोरा, ऋतुजा पिसाळ
हॉकी महाराष्ट्र: प्राइड इंडिया प्लेयर्सची कामगिरी
रजनी एतिमारपू – 5-अ-साइड विश्वचषकात भारताची कर्णधार
वैष्णवी फाळके – आशिया कप, ऑलिम्पिक पात्रता, विश्व लीग, सिनियर विश्वचषकमध्ये सहभाग
अक्षता ढेकळे- सीनियर विश्वचषक, ज्युनियर विश्वचषक, 5-अ-साइड विश्वचषक
रुतुजा पिसाळ – 5-अ-साइड विश्वचषक, ज्युनिअर विश्वचषक, अर्जेंटिना दौऱ्यासाठी कर्णधार
मनश्री शेडगे, प्रियांका वानखेडे, काजल आटपाडकर, हिमांशी गावंडे, शशी प्रभा, भावना खाडे, सुष्मिता पाटील – ऑल इंडिया कॅम्पर्स