Ritu Singh : पिंपरी चिंचवड : आयआयबीएम कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी तणाव व्यवस्थापन (स्ट्रेस मॅनेजमेंट) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत रितू सिंग (योग आणि आहारतज्ज्ञ) यांनी विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना तणाव व्यवस्थापन तंत्रांबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थी आणि प्राध्यापकांना तणावाचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल माहिती देवून तणाव कमी करण्यासाठी आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी विविध तंत्रांचा सराव करावा. योगासने आणि ध्यानधारणा यांचा तणाव कमी करण्यासाठी उपयोग कसा करावा, याबाबत उपयुक्त माहिती देण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर, प्राचार्य प्रदीप फुलकर, विभाग प्रमुख अमोल भागवत, अनिकेत वंजारी, प्रतीक्षा डफल, पीसीएमसी स्मार्ट सारथी टीमचे अधिकारी बिनीश सुरेंद्रन, किरण लवटे, जस्टिन मॅथ्यू आणि आशिष चिकणे यासह शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संयोजन ट्रेनिंग आणि प्लेसमेंट कॉर्डीनेटर गरिमा मलिक यांनी केले. मिलिंद तायडे आणि एकता सिंग यांनी पाहुण्यांचे स्वागत आणि आभार व्यक्त केले. तणाव व्यवस्थापन कार्यशाळा विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी उपयुक्त ठरली.