पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) आणि त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या माध्यमातून धमकावणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थ्याला मुंबई गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली. आरोपी शुभम वरकड हा मूळचा नांदेडचा असून तो पुण्यात बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्सचे (बीसीए) शिक्षण घेत आहे. तो प्रथम वर्षाचा विद्यार्थी असून या धमकीमागचा त्याचा हेतू तपासला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Pune Crime : पत्नीसोबतचा वाद, तरुणाने पोलिस चौकीसमोर केले स्वतःवर ब्लेडने वार; पुण्यातील घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभय नावाच्या व्यक्तीने ११ फेब्रुवारी रोजी एक्सवर एक पोस्ट लिहून म्हटले होते की, “मला एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोटो हवा आहे. मी गुंडगिरी सुरू करण्याचा विचार करत आहे. माझ्याकडे थोडासा अनुभव आहे आणि गुंड मला मार्गदर्शन करू शकतात. या पोस्टला वरकडने स्वत:च्या अकाऊंटवरून रिप्लाय देताना म्हटले आहे की, “बंदूक मी आणून देतो भाऊ तुला, पण पहिला गेम एकनाथ आणि श्रीकांत यांचाच कर.”
मुख्यमंत्री आणि त्यांच्या मुलाच्या हत्येबाबत खुलेआम बोलणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक्सवर ही पोस्ट पाहिल्यानंतर तात्काळ सायबर पोलिसांकडे हे प्रकरण सोपवले, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखा आणि दहशतवादविरोधी पथकाने कारवाई करत आरोपीचा जीमेल आयडीशी जोडलेला आयपी अॅड्रेस आणि त्याचा मोबाइल नंबर आणि त्याचे लोकेशन शोधून काढले. त्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पुण्यात धाव घेऊन वरकड याला बेड्या ठोकल्या.
Gautami Patil : कोणालाच नाही माहिती गौतमी पाटील हिचं खरं नाव, जाणून घ्या काय आहे नाव…
चौकशीदरम्यान वरकड याने धमकीचा मेसेज एक्सवर टाकल्याची कबुली दिली. शुक्रवारी त्याला मुंबईत आणण्यात आले आणि सांताक्रूझ पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ५०५ (सार्वजनिक उपद्रव) आणि ५०६ (२) (धमकावणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण तपासासाठी गुन्हे शाखा युनिट ९ कडे वर्ग करण्यात आले आहे. वारकड यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
सप्टेंबर २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत एक्सवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द पोस्ट केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी ऑगस्ट २०२३ मध्ये दादर येथील कैलास कापडी याला अटक केली होती.
BIG NEWS : पुण्याचा पाणी प्रश्न मिटणार, अशी आहे पुणेकरांसाठी योजना
Journalist : पत्रकारांना धमकी देणाऱ्यास होणार ५० हजार दंड व ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास