Ganesh Natarajan : आत्मनिर्भर भारतासाठी उद्योजकांचे योगदान महत्वाचे – गणेश नटराजन

Ganesh Natarajan : ५ व्या जागतिक लाईटहाऊस समुदायाचे अध्यक्ष आणि हनीवेल ऑटोमेशन इंडियाचे संचालक गणेश नटराजन म्हणाले की देशातील उद्योगजकांसाठी स्वतःच्या हक्काचे व्यासपीठ तयार करून त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अंतर्गत छोट्या आणि मोठ्या उद्योजकांना मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. संपूर्ण भारतातील उद्योजकांसाठी महेश इंडस्ट्रियल ग्रुप (एम.आय.जी) पुणे स्थित एन.जी. ओच्या वतीने ६ व ७ मार्च रोजी बालेवाडी येथील हॉटेल ऑर्किड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन आणि परिषद भरवण्यात आली आहे. पुणेकरांना विनामूल्य पाहण्याची तर उद्योजकांना सहभागी होण्याची सुवर्णसंधी आहे.

नटराजन म्हणाले की दोन दिवस चालणाऱ्या स्मार्टटेक परिषदेमध्ये देशभरातील तसेच महाराष्ट्रातील उद्योजकांना सहभागी होता येणार आहे. या परिषदेमध्ये उद्योजकांना विविध प्रकारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कॉम्प्युटर अँड मीडिया डीलर्स असोसिएशन (सी एम डी ए ), देखील एम.आय.जी सी जोडले गेले आहेत. दोन दिवसीय कॉन्क्लेव्ह मार्केट ऍक्सेस, सस्टेनेबिलिटी, ऑटोमेशन आणि इंडस्ट्री ४.० आणि स्मार्ट टेक्नॉलॉजी या चार स्तंभांवर आधारित आहे. एमएसएमई आणि स्टार्टअपला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होण्यासाठी सक्षम बनवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. उद्योजक, नवोन्मेषक आणि तज्ज्ञांना ज्ञान, साधने आणि उपाय सामायिक करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करण्यासाठी एका तांत्रिक परिषदेचा समावेश होतो आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान प्रदर्शित करण्याच्या संधी प्रदान करण्यासाठी परिषद भरवली आहे.

उत्पादन क्षेत्रात जागतिक दर्जाचे नेतृत्व तयार करणे. हा मूळ उद्देश आहे. एमएसएमई वर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. परिषदेचे आणखी एक मनोरंजक वैशिष्ट्य म्हणजे स्टार्टअप एरिना जेथे स्टार्टअप्स त्यांची उत्पादने प्रदर्शित करू शकतात आणि स्टार्टअप्समधील गुंतवणुकीच्या संधी शोधण्यासाठी एक गुंतवणूकदार संमेलन असेल. ३ हजारहून अधिक व्हिजिटर, ३५० पेक्षा जास्त कंपन्यांचे प्रतिनिधी, २५ पेक्षा अधिक गुंतवणूकदार, २० हून अधिक उद्योग क्षेत्रातील मार्गदर्शक आणि ५ हून अधिक सरकारी आणि उद्योग क्षेत्रातील संघटना यात सहभागी झाल्या आहेत. सदरील प्रदर्शन हे पुणेकरांसाठी विनामूल्य आहे. असे एम.आय.जी चे अध्यक्ष मनोज बेहेडे यांनी सांगितले.