CEAT India : बेंगळुरूमध्ये सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग सीझन वनच्या अंतिम फेरीचे आयोजन

पुणे : सीएट इंडियन (CEAT India) सुपरक्रॉस रेसिंग लीग या भारतातील पहिल्या फ्रँचाईझी पद्धतीच्या सुपरक्रॉस लीगने बहुप्रतीक्षीत सीझन वन अंतिम फेरीचे ठिकाण बदलल्याची घोषणा केली आहे. आधी दिल्लीत होणार असलेली ही फेरी आता २५ फेब्रुवारी २०२४ रोजी बेंगळुरू येथे होणार आहे.

काही अनपेक्षित घटनांमुळे संबंधित अधिकाऱ्यांना कडक नियमांची अमलबजावणी करावी लागून लॉजिस्टिकच्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. म्हणून आयोजक समितीने संपूर्ण कार्यक्रम बेंगळुरूला स्थलांतरित करण्याचे ठरवले.

सीझनच्या अंतिम फेरीचे संपूर्ण आयोजन व अमलबजावणी सुरळीतपणे पार पाडण्यासाठी हा निर्णय अतिशय काळजीपूर्वक घेण्यात आला. प्रतिष्ठित एपीएमसी मैदान बायतरायणपुरा, फिनिक्स मॉल ऑफ एशियाच्या समोर, बेंगळुरू हे ठिकाण या सीझनच्या अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले आहे.

सुपरक्रॉस इंडिया प्रा. लि. चे संचालक आणि सह- संस्थापक वीर पटेल म्हणाले, ‘सीझन वनच्या अंतिम फेरीबद्दल सर्वत्र प्रचंड उत्सुकता आहे आणि त्याचे ठिकाण बदलल्यामुळे होणार असलेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. मात्र, विविध घटकांचा काळजीपूर्वक विचार केल्यानंतर तसेच सध्याच्या परिस्थितीची दखल घेत आम्ही हा कार्यक्रम बेंगळुरू इथं घेण्याचं ठरवलं. बेंगळुरू मोटरसायकल इव्हेंट्ससाठी प्रसिद्ध असल्यामुळे साहजिकच आमच्या भागीदारांचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत होईल आणि प्रेक्षकांचाही अभूतपूर्व प्रतिसाद लाभेल अशी खात्री वाटते. आम्हाला खात्री आहे, की या अंतिम फेरीत चाहत्यांना सुपरक्रॉस रेसिंगचा थरारक अनुभव मिळेल.’

सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग चाहत्यांना तसेच त्यात सहभागी होणाऱ्यांना असामान्य दर्जाचा अनुभव देण्यासाठी बांधील आहे. बेंगळुरूमध्ये सुपरक्रॉसचा थरार निर्माण करण्यासाठी आणि संपूर्ण अनुभव अविस्मरणीय करण्यासाठी लीग उत्सुक आहे.

सीएट आयएसआर सीझन वनच्या अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

https://indiansupercrossleague.com/