मशीनमध्ये डोके अडकून कामगार ठार

मशीनमध्ये डोके अडकून कामगार ठार

चाकण :  चाकण औद्योगिक परिसरात जे.बी.एम कंपनीत मशीन मध्ये डोके अडकून कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

गुलजर आलमगीर अन्सारी (वय – २१, सध्या रा.खालूंब्रे, मूळ रा.चेनारी, जि.रोहतास, बिहार) असे मृत कामगारांचे नाव आहे. जेबीएम कंपनीत गुलजर हा ऑपरेटर म्हणून काम करत होता. जेबीएम कंपनीत वाहन निर्मिती उद्योगाशी निगडीत वस्तू तयार केली जाते.

Shiv Sena MLA Disqualification Decision : अखेर निकाल आला; एकनाथ शिंदे यांचा पक्षच…

अन्सारी हे जेबीएम कंपनी महाळुंगे येथे रोबोट मशीनवर काम करीत असताना त्यांचे डोके रोबोट मशीनमध्ये अडकून, डोके दबल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी चाकण येथील आरोग्यम हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

दरम्यान, या घटनेनंतर मृत्यू झालेल्या कामगाराचे नातेवाईक आक्रमक झाले होते. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी ताब्यात घेतला.

auger-machine-2023-11-1f72791f84