लोणी काळभोर | पेठ येथील अल्ट्राटेक (Ultratech Company) कंपनीमध्ये वेळोवेळी कामगार व ड्रायव्हर यांना कंपनी त्रास देत असून त्याविरुद्ध सर्व कामगार मिळून श्री काळभैरवनाथ माथाडी कामगार संघटना व ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन स्थापन करून एकजूट होण्यासाठी कंबर कसली असून त्याविरुद्ध कंपनीने कुठल्याही प्रकारची संघटना व कामगार युनियन स्थापन करायची नाही. असे सांगून कंपनीमध्ये हिटलरची शाहीच आणून ठेवली आहे.
Crime News : धक्कादायक! मुलांनी बागेतील फुले तोडल्याच्या रागातून अंगणवाडी सेविकेचे नाक कापले
याबाबत कामगार युनियनचे अध्यक्ष पेठ गावचे आदर्श सरपंच सुरज चौधरी यांनी सांगितले की या कंपनीमध्ये १२ ते १३ वर्ष कामगार व ड्रायव्हर काम करत असून कुठल्याही प्रकारची सोयी सुविधा येथे उपलब्ध नाही. वेळोवेळी कामगार व ड्रायव्हर यांनी कंपनीस त्यांच्या अडचणी सांगितल्या पण कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केले.
Gautami Patil : गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात तुफान राडा, पोलिसांचा लाठीमार
अतिशय जाचक अटी कंपनीने लागू केल्या असून त्याविरुद्ध आवाज उठवल्यास ड्रायव्हर लोकांना वेळोवेळी फाईन मारला जात आहे . याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी ड्रायव्हर लोकांनी माथाडी कामगार संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून त्या मार्फत १० जानेवारी२०२४ नंतर सर्व ड्रायव्हर व आदर्श सरपंच सुरज चौधरी हे आमरण उपोषण करणार असल्याचे सुरज चौधरी यांनी सांगितले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कंपनी ड्रायव्हर लोकांना संघटित होऊ देत नसून कुठल्याही प्रकारची संघटना युनियन वगैरे स्थापन करण्यास कंपनीचा विरोध आहे.
ड्रायव्हर लोकांवर नको त्या पद्धतीने निर्बंध लागू करून दडपशाही पद्धतीने वागणूक देत आहेत तसेच पोलीस प्रशासनामार्फत ड्रायव्हर लोकांवर दबाव टाकून कंपनी स्वतःचेच खरे करत आहे .अतिशय कमी वेतनात ड्रायव्हर काम करत असून सुद्धा कंपनीत कसल्याही प्रकारची सुविधा ड्रायव्हर लोकांसाठी करत नाहीत .उलट कंपनीच्या आवारात ड्रायव्हर लोकांवर फाईन मात्र छोट्या छोट्या गोष्टीवरून मारली जाते .ड्रायव्हर लोकांचे म्हणने आहे की आम्ही आमच्या ट्रान्सपोर्ट कडे काम करत असून सुद्धा कंपनी यामध्ये जाणून-बुजून लक्ष घालून ड्रायव्हर लोकांना सतत फाईन मारण्याचा व आयडी कार्ड ब्लॉक करण्याचा दबाव टाकत असुन त्यामध्ये अनेक ड्रायव्हरांचे कार्ड ब्लॉक केले आहे .२५० ते 300 कामगारांना कंपनीमध्ये कसल्याही प्रकारची सुविधा नाही.
गाडी भरातेवेळी ड्रायव्हर लोक उपाशी तापाशी स्टेरिंग वर बसून असतात. कामगारांना कसल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नसून 300 कामगारांना कंपनी अतिशय हीन वागणूक देत आहे. कंपनीने वेळोवेळी पोलीस प्रशासनाला हाताशी धरून कामगारांवर दबाव टाकल्याची माहिती कामगारांनी दिली आज झालेल्या बैठकीत कामगारांच्या मान्य मागण्या मान्य केल्या नसून उलट कंपनीनेच कामगारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.
कालच्या बैठकीत पोलीस प्रशासन प्रशासनापुढे कंपनीतील अधिकाऱ्यांनी कामगारांच्या ज्या काही मागण्या असतील त्या वरिष्ठांना सांगून निर्णय देण्याचे मान्य केले होते. पण आज झालेल्या बैठकीत कंपनीने ताठर भूमिका घेऊन कामगारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. व युनियनचा बोर्ड लावण्यास विरोध केला. व इथे युनियन ,माथाडी कामगार संघटना चालणार नसल्याचे स्पष्ट केले अशी माहिती सुरज चौधरी यांनी दिली.
याबाबत कामगार नेते संपत गोते , संदीप वाघमारे ,किरण घंटे ,रुपेश नवगिरे यांनी सांगितले की १० जानेवारीपर्यंत कंपनीने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर १० जानेवारी नंतर सर्व कामगार आमरण उपोषणास बसणार असून तोपर्यंत कुठलाही कामावरती जाणार नाही. कंपनी अतिशय कामगारांना अतिशय तुच्छ वागणूक देत असून यावर कामगार आयुक्त काय निर्णय घेतात याकडे सर्व पुणे जिल्ह्याचे व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.