LONIKALBHOR : मांजरी उप बाजारात संचालकांच्या निर्णयाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध (Video)

लोणी काळभोर (LONIKALBHOR) | सचिन सुंबे

मांजरी उप बाजारात दुबार विक्री व खोतेदार पद्धतीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असुन तीन महिन्यापुर्वी संचालकांनी शेतकऱ्यांच्या बाजुने निर्णय घेतला होता त्याला शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला होता पण आता संचालकांनी परत खोतेदार पध्दीतीला परवानगी दिली असुन त्याला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला असून आज हजारो शेतकरी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी ,रयत क्रांतीचे पुणे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत काळभोर यांच्या नेतृत्वाखाली बाजार आवारात आंदोलन करून या पद्धतीला तीव्र विरोध केला आहे.

हिंजवडीतलं OYO हॉटेल, रूम नं 306; ‘त्या’ रात्री भयंकर घडलं…; नाकाबंदीमुळे आरोपी सापडला

हा बाजार शेतकरी आणि ग्राहक असुन येथे दुबार विक्री व खोतेदार पध्दत अवलंबून देणार नसल्याचे हजारो शेतकऱ्यांनी सांगितले.

Porn Star Jesse Jane : लोकप्रिय पॉर्नस्टार जेसी जेन आणि बॉयफ्रेंड Brett Hasenmueller चे निधन; राहत्या घरात आढळले मृतावस्थेत, ड्रग ओव्हरडोज झाल्याचा संशय

हवेलीतील शेतकऱ्यांची आज पहिल्यांदाच ऐकी झाल्यामुळे मराठा आंदोलनाचा परिणाम जाणवला .मराठा योध्दा मनोज जंरागे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज एकत्र करून आंदोलन केले व यश मिळवले त्याच पध्दतीने हवेली तालुक्यातील व शेजारील तालुक्यातील शेतकऱ्यांची ऐकी बघायला मिळाली त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना न्याय देणारच असल्याचे रयत क्रांती संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष सुर्यकांत काळभोर यांनी सांगितले.

Crime : मधुचंद्राच्या रात्री पत्नीला कळले नवरा नपुसंक, ‘माझा मुलगा कामाचा नाही..’ म्हणत सासरा बेडरुममध्ये

शेतकऱ्यांच्या विरोधात जर कुणी हवेली तालुक्यातील गावपुढारी गेले तर येणाऱ्या प्रत्येक निवडणूकीमध्ये पराभव करण्यास शेतकरी तयार राहणार असल्याचे सुर्यकांत काळभोर यांनी सांगितले .

Crime News :‘त्या’ खुनाचा 12 तासांत उलगडा; मित्राच्या मदतीने पतीचा घात

हवेली तालुक्यातील मांजरी उपबाजार हा शेतकऱ्यांसाठीच पुणे  कृषी  उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तयार करण्यात आला असून खोतीदार दुबार विक्रेते दोन ते तीन तासाच्या विक्रीतून मालामाल झाले आहेत. हा बाजार फक्त शेतकऱ्यांच्याच साठी तयार केला आहे.

a422c706-9f2d-40ac-8c65-81507f7110cb

तालुक्यातील एक शेतकरी संघटना व्यापाऱ्यांची बाजु घेत असुन ही संघटना खरोखरच शेतकऱ्यांची आहे की व्यापाऱ्यांची अशी टीका शेतकऱ्यांनी केली . या संघटनेला जर शेतकऱ्यांची बाजु घ्यायचे नाही तर शेतकरी नाव ही संघटना का धारण करत आहे .ऐकीकडे शेतकरी नाव धारण करून मोठे व्हायचे आणि दुसरी कडे शेतकऱ्यांच्या विरोधात आंदोलने करायचे असे जर शेतकरी संघटना करत असेल तर शेतकऱ्यांच्यातुनच मनोज जरांगे पाटील तयार होतील असे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले .त्यामुळे मांजरी बाजार हा फक्त शेतकऱ्यांचा राहिला पाहिजे असा सुरू शेतकऱ्यांमधुन निघत आहे . त्यामुळे संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे.